लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:46+5:302021-02-12T04:33:46+5:30
दि. १२ रोजी सोमलवाडा(नामाप्र स्त्री), रेंगेपार (कोठा) ( सर्वसाधारण),दैतमांगली ( सर्वसाधारण स्त्री), शिवनी (अनु. जाती), रामपुरी (अनु. जाती), खेडेपार ...
दि. १२ रोजी सोमलवाडा(नामाप्र स्त्री), रेंगेपार (कोठा) ( सर्वसाधारण),दैतमांगली ( सर्वसाधारण स्त्री), शिवनी (अनु. जाती), रामपुरी (अनु. जाती), खेडेपार (नामाप्र स्त्री), सिंदीपार /मुंडीपार (नामाप्र स्त्री), रेंगेपार (कोहळी) ( सर्वसाधारण),सिपेवाडा ( सर्वसाधारण),चान्ना ( सर्वसाधारण), दि. १५ रोजी पोहरा ( सर्वसाधारण),किन्ही (नामाप्र), रेंगोळा (अनु. जाती), धाबेटेकडी (अनु. जमाती स्त्री), परसोडी ( सर्वसाधारण स्त्री),झरप ( सर्वसाधारण),खैरी (नामाप्र स्त्री) ,लोहारा (नामाप्र), सोनमाळा (अनु. जाती स्त्री), डोंगरगाव (साक्षर) ( सर्वसाधारण स्त्री) याप्रमाणे सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक पार पडणार आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून कृषी विस्तार अधिकारी के. एन. चव्हाण, विस्तार अधिकारी बी. एस. भोयर ,कृषी पर्यवेक्षक ए.पी.जिभकाटे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. आर. तिरसागडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी एम. डी. केवट, कृषी पर्यवेक्षक ए. के. शहारे ,कनिष्ठ प्रभाटी अधीक्षक एस. एस. गोमासे,वरिष्ट सहायक एन. एच. कटरे,विस्तार अधिकारी पी. एल. राघोर्ते, वरिष्ठ सहाय्यक आर .सी. कुलसुंगे ,कृषी पर्यवेक्षक एम. एन. खराबे, मंडळ अधिकारी एस. जी. आकलुनवार ,जयंत सोनवाणे यांची नियुक्ती तहसिलदार मल्लिक विरानी यांनी केली आहे.