ट्रॅक्टरच्या धडकेत वीज खांबाचे तुकडे
By admin | Published: October 11, 2015 01:58 AM2015-10-11T01:58:50+5:302015-10-11T01:58:50+5:30
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने वीज खांबाला धडक दिली.
तुमसर : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने वीज खांबाला धडक दिली. यात सिमेंट वीज खांबाचे दोन तुकडे झाले. प्रवाहीत वीज तारा रस्त्यावर तुटून पडल्या. परंतु रस्ता निर्मनुष्य असल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास बाम्हणी नदी काठावर घडली.
३० सप्टेंबर पर्यंत नदी घाटातून रेती उत्खनन व वाहतूकीची परवानगी होती. परंतु बाम्हणी रेती घाटावरून अवैध रेतीचा उपसा अद्यापही सुरुच आहे. शनिवारी दुपारी १ वाजता एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका वीज खांबाला धडक मारली. यात सिमेंटचा वीज खांबाचे दोन तुकडे झाले. वीज प्रवाह तारा रस्त्यावर तुडून पडल्या. आरडाओरड केल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घेऊन धुम ठोकली. बाम्हणी नदी घाटावर यावेळी ८ ते १० जण होते. तारा रस्त्यावर पडल्याने खळबळ माजली. गावात असलेल्या मुख्य डी.पी.तून वीज प्रवाह बंद करण्यात आला. रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. १०० मीटर अंतरावर या परिसरात वीज कंपनीचे कर्मचारी कामे करीत होते. हा वीज खांब तुटून पडल्याची तिसरी वेळ असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.सध्या रेती घाटावरून रेती उत्खनन व वाहतूक बंद आहे परंतु बाम्हणी रेतीघाट अपवाद ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)