विद्युत खांब बांधून ठेवले जांबाच्या झाडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:34+5:302021-05-25T04:39:34+5:30
अडयाळ : दोन दिवसआधी ‘लोकमत’मध्ये गावातील विद्युत खांब धोकादायक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच ग्रामस्थांनी त्याचा पाठपुरावा ...
अडयाळ : दोन दिवसआधी ‘लोकमत’मध्ये गावातील विद्युत खांब धोकादायक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच ग्रामस्थांनी त्याचा पाठपुरावा केला. अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. सोमवारच्या दुपारी अडयाळमधील जामा मस्जिद जवळ पाहायला मिळाली. एक ट्रॅक्टर ट्रॉली फक्त चिपकली आणि विद्युत खांब एकीकडे झुकला तर खालून जीर्ण झाल्याने तोल एकीकडे गेला असून त्याला सोमवारच्या दुपारी दुर्दैवाने एका जांबाच्या झाडाला तात्पुरता बांधून ठेवण्याची वेळ विद्युत विभागावर आली.
गावातील किती खांब असे अपघात झाल्यावर बांधून ठेवायचे हाही एक प्रश्नचं आहे.
गावात एक नाही तर अनेक खांब आज जीर्ण अवस्थेत पाहायला मिळतात आणि ते कधी कुणामुळे कोसळणार आणि त्यात कधी कुणाचा जीव जाणार याचाही काही नेम नाही. सोमवारच्या दुपारी २ च्या सुमारास झालेल्या येथील प्रकारामुळे ग्रामवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचे अजून मुख्य कारण म्हणजे याच रस्त्यावर जवळपास तीन ते चार विद्युत खांब काही घरांवर आले आहेत तर काही झुकले आहेत. कधी काळी एखाद्या ट्रॅक्टरचालकाच्या हातून जराशी डॅश जरी लागली तर येथील विद्युत खांब कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे आता तरी संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अपघात आणि मृत्यू कधी होणार हे कुणीही सांगू शकले नसले तरी निष्काळजी व बेजबाबदारपणा अंगीकारणेसुद्धा चूक की बरोबर ? असाच काहीसा प्रकार अडयाळ गावातील जीर्ण विद्युत खांब ग्रामपंचायत प्रशासन तथा विद्युत विभागाला दिसूनसुद्धा त्याकडे गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत आहेत याला बेजबाबदार व निष्काळजी म्हणायचे नाही तर काय ,कारण गावातील विद्युत खांब हे एका वर्षात जीर्ण तथा लोकांच्या घरावरून गेलेले नाही व एकाएकी वाकलेसुद्धा नाही पण जेव्हा विद्युत बिल ग्राहकांनी भरले नाही, तुमचा वापर जास्त आहे, बिल तर भरावेच लागेल असे अनेक नियम ग्राहकांना सांगितले जातात पण डोळ्यांदेखत हे सर्व होत आहे तर मग याकडे दुर्लक्ष का, असाही संतप्त सवाल विद्युत ग्राहक करताना दिसत आहे. यासंदर्भात सहाय्यक अभियंता अनुराग गजभिये म्हणाले, सदर विद्युत खांबाचे काम मंगळवारी होणार आहे. गावात अशा प्रकारे असणारे खांब यांचा सर्व्हे लवकरच करण्यात येणार आहे.