वीज अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: June 22, 2017 12:29 AM2017-06-22T00:29:14+5:302017-06-22T00:29:14+5:30
विद्युत वितरण कंपनी द्वारा जून महिन्यात देण्यात आलेले मे २०१७ चे विद्युत देयके हे दुप्पट व तिप्पट असल्याची बाब लक्षात येता....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्युत वितरण कंपनी द्वारा जून महिन्यात देण्यात आलेले मे २०१७ चे विद्युत देयके हे दुप्पट व तिप्पट असल्याची बाब लक्षात येता शिवसेना ने आज विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. व देयके कमी करुन देण्याची मागणी करत पाच दिवसांचा वेळ दिला. सोबतच वेळेच्या आत देयकांची रक्कम कमी करुन दिली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे एक निवेदन देण्यात आले. हा घेराव युवासेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुर्यकांत ईलमे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
भंडारा शहरात विद्युत कनेक्शन धारक हजारोच्या संख्येत असून त्यांना माहे जून मध्ये मे २०१७ चे देयक देण्यात आले. त्यात अनेक त्रृट्या असून ग्राहकांना सरासरीच्या दुप्पट ते चार पटीन अधिक रुपयांचे देयक देण्यात आले. ज्या बद्दल ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली असता त्याचे निराकरण न करता कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांशी असभ्य वर्तणूक केली जात आहे. ग्राहकांना पूर्ण देयक भरण्यास सांगीतले जात आहे. यात अनेक गरीबांचाही समावेश आहे. ज्यांना प्रति महिना २५० ते ३०० रुपये बिल यायचे त्यांना या महिण्यात तीन हजार रूपये व त्यापेक्षा अधिकचे देयक देण्यात आले आहे.
या मागील विद्युत विभाग द्वारा लावण्यात आलेल्या मिटरमध्ये रिडिग जंपींगचा प्रॉब्लम असुन लोकांना अतिरिक्त दोनशे व त्याहुन अधिक युनिटचे देयक देण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर जून महिन्यात देण्यात आलेल्या बिलांमध्ये मागील महिण्यात भरण्यात आलेल्या रक्कमेचा समावेश करण्यात आलेला आहे. तो सुध्दा महावितरणने कमी केलेला नाही. शहरातील हजारो ग्राहकांच्या खिशाला करोड़ो रुपयाचा चुना लावण्याचे कारस्तान विद्युत महावितरणने रचल्याचा आरोप यावेळी शिवसेनाने केला.
वरील दोन्ही बाबींना लक्षात घेवून शिवसेनने, शहरातील ग्राहकांना देण्यात आलेले अतिरिक्त बिलाची रक्कम पुढित पाच दिवसाच्या आत कमी करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विद्युत महावितरण कंपनीची राहील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
पहिले तर कार्यकारी अभियंता गेडाम हे उडवाउडवीचे उत्तरे देत देयक अतिरिक्त रुपयांचे नसल्याचे म्हणाले परंतु सोबत आलेल्यांनी देयक दाखविल्यानंतर त्यानी सॉफ्टवेअर मार्फत युनिट घेण्यात चुका होण्याची शक्यता दर्शनिली व यांची वरिष्ठांशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिवसेनेला दिया.
यावेळी शिष्टमंडळात वाहतुक सेनाचे शहर प्रमुख संदिप सार्वे, उपजिल्हा प्रमुख नितेश मोगरे, शिवसेना शहर सचिव सतिश तुरकर, उपजिल्हा प्रमुख संदिप वाकडे, युवा सेनेचे शहर प्रमुख शुभम बारापात्रे, भा.वि.सेनाचे शहर प्रमुख आकाश खरोले, भा.वि. सेनेचे उपजिला प्रमुख रोशन कोंबे, दिनेश गजबे, संजय नागदेवे, शेखर राऊत, संजयु भवसागर, अविनाश संतेकार, निखिल खुर्वे, नितेश देशमुख, अक्षय तुमसरे, योगेराज गायधने, पंकज दहिकर, अजय मेश्राम, राहुल शहारे, देवा शहारे, अविनाश निवारे, शेखर राऊत, प्रमोद संतेकार, गोविल वरफडे, आकाश खरोले, अक्षय तुमसरे, अजय चामलाटे, संजय भावसागर, शशांक शहारे, संजय मंदुरकर, सुनील शहारे, अजय पारधी, सागर शिवणकर, राकेश तोंडारे, शुभम ढेंगे, अवि नेवारे व विद्युत ग्राहक उपस्थित होते.