विद्युत खांबाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:08 AM2017-12-12T00:08:13+5:302017-12-12T00:08:35+5:30
सिलेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात असणारी विजेचे खांब विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे ठरत आहेत.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : सिलेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात असणारी विजेचे खांब विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे ठरत आहेत. खांब हटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असला तरी त्याला वाटाण्याच्यो अक्षता लावण्यात येत आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.
सिहोरा-तिरोडा मार्गावर सिलेगाव येथे जिल्हा परिषदेची पूर्व माध्यमिक शाळा आहे. या शाळेत १७० विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. या शाळेला आवारभिंतीचे बांधकाम करण्यात आहे. मार्गावरून वाहनाची वर्दळ राहात असल्याने अपघात टाळण्यासाठी आवारभिंतीचे बांधकामाला प्राथमिकता देण्यात आली आहे. शाळेच्या प्रांगणात विद्युत खांब आहे. या खांबावरून गावात विद्युत प्रवाहाचा पुरवठा केला जात आहे. खांबाचे नजीक खेळाचे मैदान तथा खेळ साहित्य ठेवण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी विद्युत खांबाचे नजीक खेळत असल्याने जीवीताला धोका निर्माण झाला आहे. शालेय प्रांगणातून विद्युत खांब हटविण्याचे वीज वितरण कंपनीला शालेय प्रशासन आणि ग्रामपंचायतने सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. परंतु विद्यार्थ्यांचा जीव वेशीवर टांगला जात आहेत. पत्रांना वीज वितरण कंपनी वाटाण्याचे अक्षदा लावत आहे. साधी या पत्राची दखल आजपर्यंत घेतली नाही. विद्युत खांब हटविण्यासाठी गावकºयांनी महिनाभराचा अल्टिमेटम दिला आहे. वीज वितरण कंपनी विरोधात गावकरी आंदोलन करणार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सिहोरा स्थित कार्यालयात विद्यार्थ्यांचा मोर्चा काढणार आहे. असे ठरावात नमूद आहे.
जिवंत विद्युत खांबामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे. खांब हटविण्याकरिता पत्र वीज वितरण कंपनीला दिले असून गावकरी व विद्यार्थी आंदोलन करणार आहे.
संध्या पारधी,
सरपंच, सिलेगाव.