हत्तीरोग दुरीकरण मोहीम १ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:11+5:302021-06-30T04:23:11+5:30

ही मोहीम १ जुलैपासून सुरू होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात ...

Elephant Disease Eradication Campaign from 1st July | हत्तीरोग दुरीकरण मोहीम १ जुलैपासून

हत्तीरोग दुरीकरण मोहीम १ जुलैपासून

Next

ही मोहीम १ जुलैपासून सुरू होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर गोळ्या या वयोगटानुसार वाटप करण्यात येतात तसेच सदर गोळ्या जेवनानंतरच खायच्या असतात.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन हे कर्मचाऱ्यांच्या समक्षच खाण्यात यावे, जेणेकरून शासनाने ठरविल्याप्रमाणे १०० टक्के लोकांनी गोळ्यांचे सेवन केल्याची खात्री होईल. सदर गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. हत्तीरोग आजाराचे दुरीकरण या शासनाच्या मोहिमेमध्ये जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

२८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागातर्फे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, असे त्यांनी सांगितले. सदर डी.ई.सी. गोळीपासून कोणताही दुष्परिणाम जाणवत नाही. करिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी म्हणाल्या, एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. परंतु हत्तीरोग होऊ नये म्हणून डी.ई.सी. गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा ‘हत्तीरोग’ दिनी अशी सलग पाच वर्षे खाल्ल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वत: व आपली भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकेल, असे त्यांनी सांगितले.

सामुदायिक औषधोपचार मोहिमेत ज्या रुग्णांनी डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्यांची मात्रा घेतली नाही त्यांनी पुढील दोन ते पाच दिवसांत गोळ्यांची मात्रा आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपलब्ध करून सेवन करावी. डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्या उपाशी पोटी घेऊ नयेत. उपाशीपोटी गोळ्या घेतल्यास मळमळ, उलटीसारखा किरकोळ त्रास होऊ शकतो. म्हणून डी.ई.सी गोळ्या काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्याव्यात. हत्तीरोग दुरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्त भागात एक दिवसीय डी.ई.सी व अलबेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवून हत्तीरोग दुरीकरण करण्याचा संकल्प आहे.

Web Title: Elephant Disease Eradication Campaign from 1st July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.