ऑनलाइन आमसभेविरोधात शेतकरी सभासदांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:03+5:302021-09-18T04:38:03+5:30

तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेतर्गत आवार भिंतीचे बांधकाम, नियमबाह्य ईमारत फंडाची वसुली व वसूल रकमेची अफरातफर यासह सचिवाच्या ...

Elgar of farmer members against online public meeting | ऑनलाइन आमसभेविरोधात शेतकरी सभासदांचा एल्गार

ऑनलाइन आमसभेविरोधात शेतकरी सभासदांचा एल्गार

googlenewsNext

तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेतर्गत आवार भिंतीचे बांधकाम, नियमबाह्य ईमारत फंडाची वसुली व वसूल रकमेची अफरातफर यासह सचिवाच्या मानधनात बेकायदेशीररीत्या केलेली वाढ आदी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लेखा परीक्षणात संस्थेवर गैरप्रकाराचा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी मोहरणा येथील काही नागरिकांनी ३० ऑगस्ट रोजी सहायक निबंधकांना तक्रार केली होती. गटसचिवांविरोधात फौजदारी कारवाईच मागणी केली होती. कोरोना पार्श्वभूमीवर शासन निर्देशाचे उल्लंघन होणार नाही यासाठी संस्थेन्तर्गत ऑनलाईन आमसभा घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

ऑनलाईन आमसभा घेताना शेतकरी सभासदाकडे मोबाइलची सुविधा नाही, मोबाइल नेटवर्कची समस्येसह मोबाईल हाताळण्यासंबंधी शेतकऱ्यांत अज्ञान आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन आमसभेच्या आयोजनाला तीव्र विरोध केला आहे. निवेदन देताना श्रीधर राऊत, मुरलीधर बगमारे, धनिराम तुपटे, टेकचंद तुपटे, विलास तुपटे, अभिमन तुपटे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

170921\img-20210916-wa0031.jpg

सहाय्यक निबंधक एस जी सुरदुसे यांच्याशी चर्चा करतांना मोहरणा येथील नागरीक

Web Title: Elgar of farmer members against online public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.