लाखोरीत धान खरेदी केंद्रासाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:34+5:30
धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर्व समस्या तयार झालेली आहेत. याचं समस्यांच्या आक्रोशात लाखोरी येथे अनेक शेतकऱ्यांद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धान केंद्र चालकाच्या दिरंगाई मुळे धान खरेदी करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत.

लाखोरीत धान खरेदी केंद्रासाठी एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील तालुका स्तरावर प्रत्येक फिडर चालू होऊन धान खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. परंतु अद्याप ही लाखोरी येथील धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे, दिवाळी अंधारात गेली, धान खरेदी केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी लाखोरी येथे आंदोलन करण्यात आले.
धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर्व समस्या तयार झालेली आहेत. याचं समस्यांच्या आक्रोशात लाखोरी येथे अनेक शेतकऱ्यांद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धान केंद्र चालकाच्या दिरंगाई मुळे धान खरेदी करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत. यामुळे संगमत करून कवडीमोलात धान खरेदी केली जात आहे.
शासनाच्या आदेशाची तात्काळ पूर्तता करावी, लाखोरी धान खरेदी केंद्रावर स्थायी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, लाखोरी धान केंद्राचे धान मोजनी आताच चालू करावी, धान खरेदी मोजणी इलेक्ट्रिक काटा वर करण्यात यावी,
दोन इलेक्ट्रिक काटे तात्काळ उपलब्ध करून द्यावे, नियमित धान खरेदी केंद्र चालू ठेवावे, क्षमतेपेक्षा जास्त बारदाना उपलब्ध करून द्यावा, नियमित डी.ओ मिळाले पाहिजे , अश्या मागण्यांचे निवेदन पणन अधिकारी, तहसीलदार लाखनी, कृषी अधिकारी लाखनी यांना देण्यात आले.