दारूबंदी, जुगार, सट्टा बंदीसाठी सासरातील महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:54+5:302021-08-15T04:36:54+5:30

अध्यक्षस्थानी लता संग्रामे होत्या. यावेळी सीताराम कापगते, बिसराम नागरीकर महाराज, कल्पना बनकर, मालिनी गोटेफोडे, सुनंदा रामटेके, मीनाक्षी बोंबार्डे, वनिता ...

Elgar of women in-laws for ban on alcohol, gambling, betting | दारूबंदी, जुगार, सट्टा बंदीसाठी सासरातील महिलांचा एल्गार

दारूबंदी, जुगार, सट्टा बंदीसाठी सासरातील महिलांचा एल्गार

Next

अध्यक्षस्थानी लता संग्रामे होत्या. यावेळी सीताराम कापगते, बिसराम नागरीकर महाराज, कल्पना बनकर, मालिनी गोटेफोडे, सुनंदा रामटेके, मीनाक्षी बोंबार्डे, वनिता नंदेश्वर, राजू बडोले उपस्थित होते. सभेमध्ये गावातील अनेक महिलांनी गावात चौकाचौकात सर्रास विकली जाणारी दारू आणि त्यामुळे दारू पिणाऱ्याकडून येता-जाता महिलांना, विद्यार्थिनींना होत असलेला त्रास, दारुड्याकडून होणारी शेरेबाजी यामुळे महिलांना व विद्यार्थ्यांना जाणे-येणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे दारू पिणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवून घरातील तांदूळ विकून दारू पितात .त्याचप्रमाणे चौकाचौकात, पान ठेल्यांवर किंवा इतर ठिकाणी सर्रास सट्टापट्टी लिहिली जाते. मोठ्या प्रमाणात जुगार खेळणेही सुरु आहे. गावात दारू जुगार सट्टा बंद करण्याचा संघर्ष करण्यासाठी "दारू,जुगार सट्टा बंदी महिला समिती सासरा "ची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्ष देवांगणा नेवारे, उपाध्यक्ष सिंधू गोटेफोडे, ज्योती बोरकर, अरुणा नेवारे, सचिव ऊषा संग्रामे, सहसचिव कुसुम गोटेफोड, सुनिता चांदेवार, सदस्यांमध्ये अनुसया गोटेफोडे, रीना गोटेफोडे, प्रभावती गोटेफोडे, शोभा गोटेफोडे यांचा समावेश आहे. शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, ठाणेदार साकोली व आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. सभेचे संचालन किशोर बारस्कर यांनी तर, आभार प्रदर्शन विनायक नंदनवार यांनी यांनी केले.

Web Title: Elgar of women in-laws for ban on alcohol, gambling, betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.