ग्राहक सेवा केंद्र संचालकाने केला अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:45+5:302021-09-19T04:36:45+5:30
मांगली चौरास येथील प्रमोद हरिश्चंद्र पडोळे याला ग्राहक सुविधा केंद्र दिले होते. आसगाव शाखेमधून लॅपटॉप घेऊन कर्मचाऱ्याच्या बरोबरीने ग्राहक ...
मांगली चौरास येथील प्रमोद हरिश्चंद्र पडोळे याला ग्राहक सुविधा केंद्र दिले होते. आसगाव शाखेमधून लॅपटॉप घेऊन कर्मचाऱ्याच्या बरोबरीने ग्राहक सेवा केंद्राचा व्यवहार सांभाळत होता. त्यामुळे जनधन खाते व इतर खात्यांचे काम तो करीत होता. अनेकांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे पैसे दिले. खातेदारांकडून मुदत ठेवीसाठी पैसे स्वीकारले. परंतु, त्यांना प्रमाणपत्र दिले नाही. उलट ग्राहकांच्या खात्यातून रकमा काढून त्यांचे खाते रिकामे केले. या अनुषंगाने काही ग्राहकांनी पोलीस स्टेशन व बँकेला माहिती दिली. त्यानंतर बँकेने आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली आहे. नागपूरवरून वरिष्ठ अधिकारी येऊन तपासणी करीत आहेत. दरम्यान, ज्यांची रक्कम यात गुंतली आहे ते बँकेत दररोज येत आहे.
कोट
ग्राहक सेवा केंद्र संचालकाने सीएसपी रेकाॅर्ड मेन्टेनन्स केला नाही. त्याने या प्रणालीचा फायदा घेऊन काम केले. यापूर्वीच्या व्यवस्थापकाने लक्ष दिले नाही. मला येथे येऊन एक महिना झाला आहे. तक्रारी देणाऱ्या ग्राहकांच्या खात्याची चौकशी सुरू आहे. तपासणीअंती ग्राहकांची रक्कम परत करण्याचा प्रयत्न बँक करणार आहे.
-हरीशकुमार जमगाडे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक.