बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:46 AM2018-08-31T00:46:05+5:302018-08-31T00:47:31+5:30
भारतीय समाजात सामाजिक समता भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आबाधित राखण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून संपूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या सेवेसाठी खर्च करणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अनुसूचित जाती जमाती सदस्य न्यायमूर्ती सी.एम. थुल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय समाजात सामाजिक समता भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आबाधित राखण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून संपूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या सेवेसाठी खर्च करणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अनुसूचित जाती जमाती सदस्य न्यायमूर्ती सी.एम. थुल यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने न्यायमुर्ती सी.एम. थुल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कारांचे सन्मानित केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ सार्कीट हाऊस भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश भवसागर होते. प्रमुख अतिथी म्हणून राहूल डोंगरे, अमृत बन्सोड, महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, रत्नमाला वैद्य उपस्थित होते.
सत्कारमूर्ती न्यायमूर्ती सी.एन. थुल यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
न्यायमुर्ती थुल म्हणाले, देशात अनेक ज्वलंत समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध समस्यांना शासन दरबारी मांडून लोकांना न्याय मिळवून देणे नैतिक जबाबदारी आहे, अशा आशावाद सत्कारात उत्तर देताना व्यक्त केला.
याप्रसंगी भंडारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते गुलशन गजभिये, नरेंद्र बन्सोड, महेंद्र वाहाने, सुबोध कान्हेकर, डोंगरे, आनंद गजभिये, शिवदास गजभिये, मोहबंसी, दिगंबर मेश्राम, प्रेमदास धारगावे, डी.व्ही. बारमाटे, भोंगाडे, मेश्राम आदी उपस्थित होते. संचालन प्रा. रमेश बी. जांगळे यांनी तर, आभार प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी मानले.