रेल्वेच्या धक्क्यात कर्मचारी चिरडून ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:41+5:302021-09-14T04:41:41+5:30
तुमसर: तुमसर रोड रेल्वे स्थानकात डाऊन मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाडीने रेल्वे कर्मचाऱ्यास धडक दिली. यात रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू ...
तुमसर: तुमसर रोड रेल्वे स्थानकात डाऊन मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाडीने रेल्वे कर्मचाऱ्यास धडक दिली. यात रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक २ घडला. सुबोध खरे (५५) रा. तुमसर रोड असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सुबोध खरे तुमसर रोड रेल्वे स्थानकात टीआरडी विभागात हेल्पर या पदावर कार्यरत होते. सोमवारी सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एका रेल्वेगाडीने सुबोध यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अपघाताची माहिती स्टेशन मास्तर यांनी जीआरपी गोंदिया यांना दिली. सुबोध यांना कोणत्या गाडीने धडक दिली, याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.