नोंदणी व मुद्रांक शुल्क कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:06 PM2018-09-19T22:06:47+5:302018-09-19T22:07:00+5:30
नांदेड येथील दुय्यम निबंधक के.आर. मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ भंडारा व गोंदिया येथील मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नांदेड येथील दुय्यम निबंधक के.आर. मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ भंडारा व गोंदिया येथील मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
नांदेड येथील दुय्यम निबंधक के.आर. मोरे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हे रद्द करण्यासाठी शासनाने आदेश निर्गमीत करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी सह जिल्हा निबंधक एम.व्ही. अंगाईतकर, सह दुय्यम निबंधक वर्ग २ जे.एम. चतुर, सह दुय्यम निबंधक वर्ग २ गोंदिया आर.एस. नानवटकर, दुय्यम निबंधक तुमसर डी.डी. चाटे, दुय्यम निबंधक लाखनी डी.व्ही. कुंभलकर, वरिष्ठ लिपीक ए.आर. भिवगडे, वरिष्ठ लिपीक एच.आर. मते, एम.आर. वाढई, एस.एम. खरवडे, व्ही.एम. गुल्हाणे, बी.एस. पवार, डी.बी. रिंडे, के.बी. गोस्वामी, एस.एम. भुरे, आर.आर. नागरे, एम.एन. तलमले, एम.एन. उमरे, एम.सी. भडके, एस.आय. गजभिये, एस.सी. सुखदेवे, एस.आर. आवटे आदी उपस्थित होते.