कर्मचाऱ्यांच्या संपाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 09:59 PM2018-08-10T21:59:34+5:302018-08-10T21:59:55+5:30

राज्यसरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या तीन दिवसीय राज्यव्यापी संपाची यशस्वी सांगता करण्यात आली. मुख्य सचिव यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने गुरुवारला चर्चा करुन ४ आॅगस्ट रोजी झालेल्या चर्चेतील सर्व मुद्देमान्य केल्याप्रमाणे व आपल्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक आहे, अशी चर्चा झालेली आहे.

Employee strikes | कर्मचाऱ्यांच्या संपाची सांगता

कर्मचाऱ्यांच्या संपाची सांगता

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समन्वय समितीने मानले शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यसरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या तीन दिवसीय राज्यव्यापी संपाची यशस्वी सांगता करण्यात आली.
मुख्य सचिव यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने गुरुवारला चर्चा करुन ४ आॅगस्ट रोजी झालेल्या चर्चेतील सर्व मुद्देमान्य केल्याप्रमाणे व आपल्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक आहे, अशी चर्चा झालेली आहे. जानेवारी २०१८ चा महागाई भत्त्याची घोषणा दिवाळीपर्यंत केली जाईल. तसेच अंशदायी पेंशन योजनेचा अभ्यास गटाच्या समितीला विशिष्ट कालमर्यादा घालुन त्यावर निर्णय घेतला जाईल. बक्षी समितीकडील वेतनत्रुटीसह अहवला पूर्ण करुन लवकरात लवकर घोषीत केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचारी वर्गाने यावेळी शासनाला संप मागे घेवुन सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य सचिव यांनी केल्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता गुरुवारला दुपारपासून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संपासाठी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार करण्यात आले, असे निवेदन मुख्यमंत्री यांचे नावे जिल्हाधिकाºयांमार्फत सादर करण्यात आले.
यावेळी रामभाऊ येवले, वसंत लाखे, अतुल वर्मा, विलास खोब्रागडे, राजेश राऊत, ताराचंद बोरकर, दिगांबर गभने, सतीश मारबते, नरेश कुंभलकर, एस. बी. भोयर, अशोक निमकर, संजय पडोळे, दिलीप रोडके, जाधवराव साठवणे, मायाताई रामटेके, कल्पना पथ्थे, रविंद्र मानापुरे, मधुसुदन चवळे, विशाल तायडे, गोविंदराव चरडे, ए.आर. खान, गणेश साळुंके, एम. जे. चामट, रमेश व्यवहारे, व्हि.टी. बागडे, सुरेंद्र बन्सोड, रघुनाथ खराबे, गजानन लोणारे, गौरीशंकर मस्के, विरेंद्र ढबाले, मलकाम मोघरे, सुर्यभान कलचुरी, आर. एस. गडपायले, माधवराव फसाटे, वसंतराव लाखे, लक्षपाल केवट, मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे, रामदास डोकरीमारे, रत्नाकर तिडके, प्रेमलाल लांजेवार, अरविंद चिखलीकर, बि.टी. रामटेके, राजेश राऊत, एम. व्ही. चावरे, आर. एस. बावनकर, एस. जी. राठोड, सी. आर. तुरकर, एल. ई. साखरवाडे, व्ही. एम. माष्ैदेकर, ओ.बी. मेश्राम, निरंजन शहारे, चंद्रशेखर पडोळे, रोशन वंजारी, सौ. प्रतिमा सिंग, डी. एल. रामटेके, प्रियंका सतदेवे, जगदीश सतदेवे, निता सेन, एस. एस. साखरवाडे, किशोर राऊत, आशिष भुरे यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद महासंघ, जिल्हा परिषद समन्वयक कृती समिती, कृतीशील निवृत्त कर्मचारी संस्था, सर्व शिक्षक संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटना, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना व जिल्हापरिषद सर्व सवंर्ग निहाय संघटना व त्यांचे पदाधिकारी हजर होते.

Web Title: Employee strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.