वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:19 AM2017-07-18T00:19:48+5:302017-07-18T00:19:48+5:30

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतीउपयोगी उत्पादनासाठी विद्युतची अत्यंत आवश्यकता आहे.

Employees are alert to the electricity consumers | वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहावे

वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहावे

Next

चंद्रप्रकाश दुरूगकर यांचे प्रतिपादन : वीज वितरण तक्रार निवारण मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतीउपयोगी उत्पादनासाठी विद्युतची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकऱ्याच्या वीज तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे आज गरजेचे आहे. याकरिता वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी केले.
भंडारा वीज वितरण तक्रार निवारण मेळावा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथील तंटामुक्त सभागृहात आयोजित मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात जि.प. सदस्य दुरूगकर बोलत होते. यावेळी सरपंच कल्पना निमकर, कोंढी ग्रामपंचायत सरपंच माया वासनिक, परसोडी ग्रामपंचायत सरपंच पंकज सुखदेवे, पंचायत समिती सदस्य अनिल वसानी, उपअभियंता प्रदीप भोयर, शाखा अभियंता महेश कोडवते, सहायक लेखापाल राजेश जागळे, ग्रामपंचायत सदस्य सिताराम बावणगडे, राहुल साखरे, जिवनलाल पुसाम, अरुणा सुहास, निर्मला जगनाडे, कुंदलता उके, प्रतिभा गिरी, मीना कांबळे, चिखली ग्रामपंचायतचे सदस्य बाळा वाघमारे, सेवानिवृत्त विज कर्मचारी नत्थु गाडीगोणे, ग्रामपंचायत कोंढीचे सदस्य विनोद दुरूगकर, उरकुडा गोंडाणे, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, ग्रामसेवक बिसेन, विज ग्राहक उपस्थित होते. उपअभियंता प्रदीप भोयर, म्हणाले कर्मचारी कमतता, साहित्यांची अत्यल्प पुरवठा यामुळे विशेष शेतकरी व वीज ग्राहकांना अडचण निर्माण होत आहे. यावर आम्हाला खेद आहे. खासदार विज कर्मचारी विज ग्राहकांचे समस्याचे तात्काळ निरकर करतील असे आश्वासन याप्रसंगी दिले.
याप्रसंगी थ्री फेज विज ग्राहक संजय लांजेवार यांनी त्यांच्या परिसरात कमी दाब वीज पुरवठा व अर्थिंग मिळत नसल्याचे सांगितले. मिटर प्रवाह बंद असताना मिटर रिडींग सुरू असतो. चिखलीचे बाळा वाघमारे यांनी शेतावरील विद्युत पुरवठा रात्री बारानंतर सुरू होतो.
पावसाळ्यात शेतकरी शेतावर कसे जाणार, वीज खंडीत झाल्यास कर्मचारी येत नाही. शेतीला पाणीपुरवठा कसा करावा, विक्री गिरीपुंजे यांचे शेताची लाईन दीड वर्षानंतर सुरू झाली. आज रात्रीला वीज पुरवठा होते. मध्येख तीन दिवस पुरवठा खंडीत झाला. लाईनमन गावात राहत नाही. शेतकरी केव्हा सुखावणार असा प्रश्न केला. दौलत मथुरे यांनी तक्रार केली की, सदर वीज कर्मचारी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करीत असतात. यावर सभाअध्यक्ष करवी सर्व समस्याचे करण्याचे आश्वासन उपअभियंता व शाखा अभियंता यांनी दिले.
याप्रसंगी विद्युत बिल आणि विजेमुळे होणाऱ्या तक्रारी ठाणा परसोडी कोंढी येथील सरपंचानी मांडले, तक्रारी संबंधी सरपंच कल्पना निमकर यांनी निवेदन दिले. संचालन राजेश जांगळे यांनी केले. आभार महेश कोडवते यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रमोद किरणापुरे, प्रेमचंद वंजारी, जितेंद्र कुलरकर, विमलकुमार वैद्य, पुरूषोत्तम चांदपुरकर, संजय मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Employees are alert to the electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.