कामगारांचा संप दडपण्याचा व्यवस्थापनाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:26 PM2019-01-29T23:26:50+5:302019-01-29T23:27:08+5:30
आयुध निर्माणी मेन गेट स्थित कामगाराचे दैनिक उपस्थिती स्वाक्षºया या ‘इलेक्ट्रोनीक्स थंब’ मशिनद्वारे न घेता दिड किलोमीटर दुर विश्राम सभागृह क्रमांत २ येथे हलचल रजिस्ट्रर वर अनधिकृतपणे संपकालीन स्वाक्षºया घेत असल्याच्या विरोधात कारखाना व्यवस्थापनावर रोष कामगार संघटनाने व्यक्त केला. दरम्यान प्रशासन व कामगार संघटनात चर्चा अंती सह्या घेणे बंद करण्यात आले. दरम्यान तीन दिवसीय संप शांततेत पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : आयुध निर्माणी मेन गेट स्थित कामगाराचे दैनिक उपस्थिती स्वाक्षºया या ‘इलेक्ट्रोनीक्स थंब’ मशिनद्वारे न घेता दिड किलोमीटर दुर विश्राम सभागृह क्रमांत २ येथे हलचल रजिस्ट्रर वर अनधिकृतपणे संपकालीन स्वाक्षºया घेत असल्याच्या विरोधात कारखाना व्यवस्थापनावर रोष कामगार संघटनाने व्यक्त केला. दरम्यान प्रशासन व कामगार संघटनात चर्चा अंती सह्या घेणे बंद करण्यात आले. दरम्यान तीन दिवसीय संप शांततेत पार पडले.
कामगारांना नवीन पेंशन योजना लागु २००४ पासून करण्यात आली होती. ती बंद करण्यात यावी व जुनी पेंशन योजना सुरु करावी. आयुध निर्माणीतील उत्पादनाचे खासगीकरण बंद करा. आयुध निर्माणीतील कामाचा वर्कलोड वाढविण्यात यावा या मागणीसाठी आॅल इंडिया डिफेंस एम्लॉईज फेडरेशन, इंडियन नेशनल डिफेंस वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघ व डेमोक्रेटिक मजदुर युनियन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुध निर्माणी गेट समोर अखिल भारतीय स्तरावर ४१ आयुध कारखान्यात मागील तीन दिवसापासून संप सुरु होते. दोन दिवस संप सुरु असल्यामुळे कामगार आल्या पावली परत जात होते. मात्र पहिल्याच दिवसापासून आयुध निर्माणी गेट मध्ये दैनिक हजेरी इलेक्ट्रोनिक्स थम मशिन द्वारे न घेता आयुध निर्माणी कारखाना बाहेर दिड किलोमीटर अंतरावर जे. डब्लू. एम., चार्जमन, एन.आई.ई.एस. कर्मचाºयांना दिवसातून तीन वेळा त्यांच्या हलचल रजिस्टर वर ‘मॅनुअल’ सह्या घेत होते. याची वाचाता कामगार संघटनेला लागताच मोर्चा स्थळापासून पायदळ चालत मोर्चा दिड किलोमीटर अंतरावर आयुध निर्माणी विश्राम भवन क्रमांक २ कडे वळविला. येथे घेण्यात आलेले स्वाक्षºया या अनधिकृत आहे. त्या स्वाक्षºया रद्द करा. संप दडपण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप संघटनेद्वारे लावण्यात आले. दरम्यान परिस्थीती चिघळू नये म्हणून कामगार संघटना प्रबंधक, अप्पर महाप्रबंधक यांच्यात चर्चा अंती प्रकरण शांत झाले. घेतलेले स्वाक्षरी रद्द करु, बोर्डाला स्वाक्षºया पाठविले जाणार नाही. तीन दिवसीय संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान संपकाळात करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहावी यासाठी आयुध निर्माणी सुरक्षा प्रमुख कर्नल शिवाजी वरघडे, जे.एटी. अभिजीत वैद्य, ठाणेदार सुभाष बारसे, आपल्या ताफ्यानीशी मोर्चा स्थळी उपस्थित होते. तर संप यशस्वी होण्यासाठी संघटनेचे एम्लोईज युनियनचे महासचिव निलेश भोंगाडे, आयुध कामगार संघाचे महासचिव योगेश झंझाड, न्यु एम्लोईज फेड्रेशन वर्कर्स युनियनचे महासचिव चंद्रशिल नागदेवे व डेमोक्रेटीक मजदुर युनियनचे महासचिव अतिश दुपारे, युनियन सदस्य, कामगार यांनी सहकार्य केले.