कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:02 PM2018-01-01T23:02:03+5:302018-01-01T23:02:18+5:30
वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासन व प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासन व प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.
वस्तू व सेवाकर कार्यालय, भंडारातील कर्मचाऱ्यांनी ४ ते ८ डिसेंबर असे पाच दिवस काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतरही शासन व प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ४ ते ५ जानेवारीला राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्टÑ वस्तू व सेवाकर अधिकारी कर्मचारी समन्वय समितीने घोषित केले आहे, अशी माहिती अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे यांनी दिली.
राज्य सरकारला सर्वाधिक उत्पन्न वस्तू व सेवाकर विभाग देतो. मात्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन उद्दीष्टपूर्ती करण्याकरिता आवश्यक गट ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, विभागातील वेतन त्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावा, राज्य कर सहआयुक्त व राज्यकर उपआयुक्त वर्गातील कुंठीतता दुर करा, विभागाच्या पुर्नरचनेत व सेवा नियमातील बदलात संघटनांना विश्वासत घेणे, वस्तु व सेवा कर विभागात केंद्राच्या धरतीवर समान काम, समान पद व समान वेतन ही त्रिसुत्री लागू करा, विभागीय संवर्ग वाटप अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरुपी सूट द्यावी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील ताणतणाव कमी करणे व सन्माजनक वागणूक मिळावी, आणि इतर जिल्ह्याचे प्रश्न त्याचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम केले तरीही शासन व प्रशासनाने लक्ष दिले नाही.
त्यामुळे राज्यात ४ व ५ जानेवारीला राज्यात सामुहिक रजा आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्टÑ विक्रीकर कर्मचारी संघटना मुंबई, नागपूर विभागाचे सदस्य राजेश प्रा. राऊत यांनी दिली.