कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:31 PM2018-09-02T21:31:15+5:302018-09-02T21:31:31+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या समस्याबाबद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, समाज कल्याण अधिकारी झिंगरे, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता, कृषी विभागाचे अधीक्षक खोब्रागडे, शिक्षण विभाग (प्राथमिक) अधीक्षक राठोड, माध्यमिक शिक्षण अधीक्षक मेश्राम, सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक निशाने, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वीय सहाय्यक नितीन शर्मा, आरोग्य विभाग कक्ष अधिकारी बनकर, आरोग्य विभाग अधीक्षक मडकाम व अधिकारी कर्मचारी हजर होते.
सभेत जि.प. कर्मचाऱ्यांच्या समस्या जिल्हा परिषदेतील वर्ग-३, वर्ग-४ च्या रिक्त पदांची माहिती, सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शासन निर्णयानुसार वर्ग-३, वर्ग-४ च्या कर्मचाºयांची पदोन्नती करणे, ३ वर्ष, ५ वर्ष एकाच टेबलावर, विभागात कार्यरत कर्मचाºयांची टेबल, विभाग बदली करणे, दरवर्षी पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी, ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे दुसरा व चवथा शनिवारचा लाभ देण्याबाबत स्वतंत्र पत्रक काढणे, जि.प. तील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या पदनावात शासन निर्णयाप्रमाणे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असे पदनाम करणे, पुष्पमाला कवळूजी जिभकाटे यांची सन २०१८ ची थांबवलेली वेतनवाढ पूर्ववत करण्यात यावी, आरोग्य सेविका आय.पी. जनबंधू यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, चार बंधपत्रीय आरोग्य सेविका यांचे सुरवातीच्या वेतनाची थकबाकी तात्काळ अदा करण्यात यावी, नम्रता विकास पाटील यांना अनुकंपा तत्वावर शिक्षण सेवक पदावर घेण्यात यावे. सहायक शिक्षक वाय.एस. बोरकर यांना दिड वर्षाचे थकीत वेतन अदा करण्यात यावे. सहायक शिक्षक कैलास खोब्रागडे यांना नियुक्ती आदेशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे. कला क्रिडा निदेशक यांना शासन परीपत्रकाप्रमाणे पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे तसेच त्यांना पटसंख्येची अट ठेवण्यात येऊ नये आणि कामावर नियमीत करणे माध्यमिक शिक्षक यांना शालेय शिक्षण विभागाच्या १४ नोव्हेबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार सेवाजेष्ठता देण्यात यावी, विस्थापीत शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, खोट्या अपंग प्रमाणपत्रावर व खोट्या माहितीवर बदली केलल्या शिक्षकांची चौकशी करण्यात यावी, चौकशी करताना अंतर हे गुगल मॅपचेच घेण्यात यावे, ११७ शिक्षकापैकी १११ शिक्षकांना बदलीसाठी उच्च न्यायालय नागपूर, महसूल आयुक्त नागपूर यांच्या झालेल्या आदेशाप्रमाणे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांनी त्यांच्या मुळ ठिकाणी परत करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले, त्यामुळे त्यांना टीयुसी भरण्याचा अधिकार नसताना टीयुसी भरलेल्या असल्यामुळे पात्र शिक्षकांना अपात्र करण्यात आले. त्यामुळे पात्र शिक्षक विस्थापित झाले. २७ फेब्रुवारी २०१७ नंतरच्या सर्व अपंग प्रमाणपत्राची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यावर चर्चा केली
सभेला संघटनेचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विजय सुदामे, जिल्हा सचिव हरिश्चंद्र धोंडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोवते, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शंभू घरडे, हरीकिसन अंबादे, सुरेश शिंगाडे, बाबुराव गिऱ्हेपुंजे, प्रभू तिघरे, डुंभरे, पुष्पमाला जिभकाटे, नम्रता पाटील, रक्षा दिपक मेश्राम, शैलेश जांभुळकर अनेक विभागातील अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.