कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:57 PM2019-03-08T21:57:14+5:302019-03-08T21:57:33+5:30

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची त्रैमासिक सभा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारला झाली. सभेत संघटनेकडून मांडण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी विभाग प्रमुखांना दिलेत.

Employees' problems will be resolved | कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील

Next
ठळक मुद्देसीईओंचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची त्रैमासिक सभा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारला झाली. सभेत संघटनेकडून मांडण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी विभाग प्रमुखांना दिलेत.
संघटनेकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्या त्यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्यामध्ये २९ आॅगस्ट २०१८ ला संघटनेची सभा झाली होती त्याचे इतिवृत्त ७ ते ८ महिने उशीरा प्राप्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. विनय रामप्रसाद सुदामे यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आरोग्य सहायक या पदाचा मानीव दिनांक देण्यात यावा, सदर प्रकरण विभागीय आयुक्त नागपूर यांना ७ दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
शामकला रविंद्र पचंभाई यांच्यावर अनुकंपा भरतीत झालेल्या अन्याय दुर करण्यात येवून त्यांना कनिष्ठ सहायक पदाचा मानीव दिनांक देण्यात यावा व संपूर्ण चौकशी करण्यात यावी यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर प्रकरणाचा प्रस्ताव ३ दिवसात चौकशी करुन विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. सन २०१७-१८ ची जीपीएफ स्लीप कर्मचाºयांना मिळाली नाही यावर १५ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. ६ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते जीपीएफ खात्यात जमा न करता काही हप्ते जीपीएफ ला तर काही हप्ते एनपीएस खात्यात जमा करण्यात आल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या दुबे पं.स. लाखांदुर यांना पैसे परत मिळाले नाही, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश वित्त विभागास दिले.
विस्थापित रँडम व पती-पत्नी एकत्रीकरणामध्ये शिक्षण प्राथ. विभाग यांच्याकडून फारच निष्काळजीपणे व प्रकरण संथगतीने हाताळला असून बदली प्रक्रियेतील दोषी आढळलेल्या १३ शिक्षकांवर व अपंगत्वाचे १५ प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच जिल्हा परिषद शाळा खरबी येथील एक शिक्षीका ७ तारखेला मृत्यू पावली, त्यांच्या जागेवर १० तारखेला खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकाला कसे काय सामावून घेण्यात आले. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येवून रँडम, विस्थापीत व पती-पत्नी एकत्रीकरणातील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठ दिवसात कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभाग प्राथमिक यांना दिले. आरोग्य विभागातील कर्मचाºयांची पदोन्नती येत्या तीन दिवसात करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले.
संघटनेची सभा शासन निर्णय ३ मार्च २०१८ नुसार दर तीन महिन्यानी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेला दिले. जैराम महादेव शेंडे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत सामावून घेत मागील संपूर्ण थकबाकी देण्यात यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली. जि.प. मुद्राणालयातील दोन कर्मचारी यांना वर्ग-३, वर्ग-४ च्या पदावर जि.प. सेवेत सामावुन घेण्यात यावे, नम्रता विलास पाटील यांना अनुकंपा तत्वावर शिक्षण सेवक या पदावर सामावून घेण्यात यावे, अशा अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली, सदर सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी प्राथ. लक्ष्मण पाच्छापुरे, नितीन शर्मा, मेश्राम व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सभेला संघटनेच्या शिष्टमंडळात उपमहासचिव सुर्यभान हुमणे, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, जिल्हासचिव हरिशचंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोवते, विधी सल्लागार अ‍ॅड. बाबुराव दामले, अजय रामटेके, युवराज देशभ्रतार, दिनेश मेश्राम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंभू घरडे, सचिव बाबुराव गिºहेपुंजे, अचल दामले, कविता राऊत, सिध्दार्थ चौधरी, शामकला पंचभाई, जयराम शेंडे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Employees' problems will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.