वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:25+5:30
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापिठ सेवक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी खाजगी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापिठ सेवा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने दिलेल्या निवेदनात यापुर्वी शासनाला अनेकदा निवेदने दिली असून शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष महेश कुथे, सचिव चंद्रशेखर शहारे, उपाध्यक्ष यशपाल कऱ्हाडे, सिद्धार्थ शृंगारपवार यांच्यासह स्थानिक भंडारा जिल्हा कार्यकारणीचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.