कोंढा पोलीस चौकीला कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:40 PM2019-03-05T21:40:06+5:302019-03-05T21:40:20+5:30

कोंढा येथे गेल्या पाच वर्षापासून पोलीस चौकी मंजूर आहे. नागरिकांच्या सोसीसाठी येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याचे त्यावेळच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकीचे उद्घाटन करतेवेळी मान्य केले होते. पण अजून चौकीला कर्मचारी न मिळाल्याने नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी अड्याळ येथे जावे लागत आहे.

Employees waiting for the Konda police chowki | कोंढा पोलीस चौकीला कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

कोंढा पोलीस चौकीला कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

Next
ठळक मुद्देगृह विभागाचे दुर्लक्ष : पाच वर्षापुर्वी झाले होते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कोंढा येथे गेल्या पाच वर्षापासून पोलीस चौकी मंजूर आहे. नागरिकांच्या सोसीसाठी येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याचे त्यावेळच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकीचे उद्घाटन करतेवेळी मान्य केले होते. पण अजून चौकीला कर्मचारी न मिळाल्याने नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी अड्याळ येथे जावे लागत आहे.
अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंढा हे बीट आहे. या बिटमध्ये सर्वात जास्त गुन्हे घडत असतात. पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त घटना कोंढा परिसरात घडतात. मारामारी, चोरी, खून अशा घटना नेहमी येथे घडत असतात. कोंढा येथे दर बुधवारला आठवडी बाजार भरतो, येथे विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या अनेक भागातून तसेच छत्तीसगड राज्यातून जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकरी, बँक अधिकारी, कर्मचारी येत असतात. बाजारात येथे लाखो रूपयाचे व्यवहार होत असतात. बुधवार दिवशी कोंढा, कोसरा येथे मेनरोडवर वाहतुकीची मोठी कोंढी निर्माण होते. बाजाराला लागून चारचाकी वाहने यांची देखिल वर्दळ असते.
कोंढा परिसरात २५ गावे येत असतात. त्यांना लहान मोठ्या तक्रारी दाखल करण्यासाठी अड्याळ येथे जावे लागते. पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा या दोन्ही गावांची लोकसंख्या १० हजारापेक्षा जास्त असून हे दोन्ही मोठी गावे आहेत. परिसरात नेहमी खून, मारामारी, चोरीच्या घटना घडतात तेव्हा फिर्यादी, आरोपी यांना बयान व चौकशीसाठी अड्याळ येथे जावे लागते ते गरीब व्यक्तींना परवडणारे नाही.
पाच वर्षापुर्वी येथे पोलीस चौकी मंजूर झाल्यानंतर तेव्हाचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दोन पोलीस कर्मचारी येथे उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांची बदली झाली नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आले त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून पोलीस चौकीला कर्मचारी मिळाले नाही.
दरवर्षी नवीन पोलीस कर्मचारी भरती केले जात असते पण येथील चौकीला कर्मचारी मिळत नाही हे दुदैव आहे. सध्या भंडारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचे जागी अरविंद साळवे हे रूजू झाले आहेत. त्यांनी पोलीस खात्यास लोकाभिमुख करणार असे म्हटले आहे तेव्हा कोंढा येथील बंद असलेली पोलीस चौकी सुरू करून यासाठी नेहमी येथे दोन पोलीस कर्मचारी रूजू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Employees waiting for the Konda police chowki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.