बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:55 PM2018-07-01T21:55:35+5:302018-07-01T21:56:14+5:30
स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित श्रीगणेश हायस्कूल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित श्रीगणेश हायस्कूल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान. रक्तदान केल्याने माणुस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. या शिबिरास दिलेल्या वेळेत सरळ सहभागी होता येईल. याकरिता नोंदणी करण्याची गरज नाही. रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक-युवती महिला, सरकारी, खाजगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, क्रिडाप्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करु शकतात.
अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा कार्यालय प्रमुख मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहन
बाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखीमंच व युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेतेबंधु व वाचक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र
आयुश ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान करणाºया प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.