निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:06 PM2018-07-08T22:06:15+5:302018-07-08T22:06:29+5:30
मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
मोहाडी पंचायत समितीसमोर ग्रामीण रुग्णालयाचे निवासाचे गाळे तयार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी निवासस्थान उभी आहेत ती जागा कोणाची याविषयी वाद झाला होता. वादाच्या फेºयातून ती जागा ग्रामीण रुग्णालयाच्या ताब्यात गेली. तिथे देखणी ईमारत बांधून दहा गाळे तयार करण्यात आले. निवासाचे गाळे निर्माण होऊन बरेच दिवस झाले. परंतु, अजूनही त्या रिकाम्या निवासात डॉक्टर व त्यांच्या सहयोगी अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारिका वॉर्डबाय यांना राहण्यासाठी केले आहे. यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारिका मोहाडी येथील मुख्यालयी राहत नाही. हे सगळे दुसºया शहरातून ये-जा करतात. त्यामुळे रूग्णांना उत्कृष्ट सेवा मिळत नाही. आरोग्य विभागातील कर्मचाºयांना हक्काचे निवास मिळावे. रूग्णांना उत्तम सेवा देता यावी म्हणून मुख्यालयी राहण्यासाठी शासनाने शासन निर्णय केले आहे, असे ग्रामीण रूग्णालयाचे अधिकारी सांगत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निवासाचा ताबा दिलेला नव्हता. ताबा दिल्यानंतरच तिथे जाता येणे शक्य आहे. आता या निवास गाळ्यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. तरीही त्या निवासात जाण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक व अन्य कर्मचाºयांना वाट बघावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाडे प्रक्रिया व्हायची आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भाडे प्रक्रिया झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाºयांना गाळे देण्यात येतील.
- डॉ. बी.ए. चव्हाण, वैद्यकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोहाडी.