पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:21 AM2017-10-05T00:21:20+5:302017-10-05T00:21:33+5:30

नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले.

Enclosing power engineers | पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव

पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव

Next
ठळक मुद्देसहा तासांचे भारनियमन : व्यावसायिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले. विद्युत बंद किंवा सुरु ठेवणे स्थानिक अधिकाºयांचे अधिकारात नाही. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि पवनीचा अर्धा भाग तीन तास अंधारात राहिला.
व्यापारी व व्यापारी संघाचे पदाधिकारी पावर हाऊसवर धडकले. याची माहिती नगर विकास आघाडीचे प्रमुख विलास काटेखाये यांना माहिती झाल्याने त्यांनी पावर हाऊस गाठले व वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. गुरूवारला दुपारी १२ वाजता महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्यामुळे घेराव आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. परंतु पवनी नगरातील सायंकाळी होणारी तीन तासांची लोडशेडींग बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल. अशी धमकीवजा सूचना व्यापाºयांनी उपस्थित अधिकाºयांना दिलेली आहे. ‘अच्छे दिन आये है’ अशा घोषणा देत व्यापारी घरी परतले.

Web Title: Enclosing power engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.