अतिक्रमणाने काेंडला बाजाराचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:00 AM2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:32+5:30
पालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या माेठा बाजार परिसरातील व्याप्ती माेठी आहे. काेराेना संक्रमण काळात आठवडी बाजारासह व्यापारी लाईनमध्ये माेठी अवकळा पहायला मिळाली हाेती. हळूहळू रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे रेलचेल वाढली आहे. राेज लाखाेंची उलाढाल हाेत असली तरी काेविड नियमांची पायमल्ली हाेत आहे. मुख्य बाजार पेठेतील अन्नपुर्ण माता मंदिर चाैक ते बसस्टाॅपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळताे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकीकडे काेराेना रुग्ण संख्या कमी हाेण्याच्या पाश्र्वभूमीवर नियमानुसार जिल्हा प्रशासनाने नियम शिथिल केले तर दुसरीकडे या नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या माेठा बाजारपेठेत दिसून येत आहे. अतिक्रमणाने या बाजाराचा श्वास काेंडला असून ऐन काेराेना महामारीच्या संक्रमणात साेशल डिस्टन्सिंगचा सर्रास फज्जा उडत आहे.
पालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या माेठा बाजार परिसरातील व्याप्ती माेठी आहे. काेराेना संक्रमण काळात आठवडी बाजारासह व्यापारी लाईनमध्ये माेठी अवकळा पहायला मिळाली हाेती. हळूहळू रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे रेलचेल वाढली आहे. राेज लाखाेंची उलाढाल हाेत असली तरी काेविड नियमांची पायमल्ली हाेत आहे. मुख्य बाजार पेठेतील अन्नपुर्ण माता मंदिर चाैक ते बसस्टाॅपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळताे. सांगूनही वारंवार रस्त्यारच दुकाने थाटली जातात.
फेरीवाल्यांनी जणू येथे कहरच केला आहे. परिणामी कर देवून दुकाने नियमात चालविणाऱ्यानी काय करावे हा माेठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात राेज लहान माेठे भांडण तंटे हाेत आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण काढल्यानंतर आठवड्यातून एकदा भरारी पथकाचे वाहन येथून गस्तीवर पाठविल्यास अतिक्रमणाला चाप बसू शकताे. परंतु एकदा कारवाई झाल्यानंतर तेथे बघितले सुध्दा जात नाही. परिणामी अतिक्रमण धारकांचे मनसुबे अधिकच बुलंद हाेत आहे.
महिन्याभरापूर्वी झाली हाेती कारवाई
- रस्त्यावर शेड काढून दुकानदारी थाटणाऱ्या अशा अतिक्रमण धारकांवर पालिका प्रशासनाने जेसीबीचा बडगा उभारला हाेता. मात्र दुसऱ्या दिवसापासून अतिक्रमण जैसे थे झाले आहे. अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहितीही या अतिक्रमण धारकांना मिळत असल्याची धुसपूस ऐकावयास मिळत आहे. रस्त्यापर्यंत दुकाने थाटल्याने येणाऱ्या ग्राहकांचे वाहन पार्किंग करायला कुठेच जागा नसते. ऐन काेराेना महामारीच्या काळात नियमांचे पालन करणे तर साेडाच अतिक्रमणाच्या नावाखाली जागा हडपण्याचा डावही रचला जात आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देणार काय असा सवाल येथील नियमित कर भरणाऱ्या दुकानदार विचारित आहेत.
- याच बाजार परिसरात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. रस्त्यावर दुकानदारी थाटून बसलेल्यांवर पाेलीस प्रशासनाचे वचक नसल्याचेच दिसून येते. येथे कुठलेही नियाेजन नसल्याने लहान माेठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काेविड नियमांचे पालन हाेत नसताना जुन्या समस्याकडेही सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. दुकानांचे शेड लावणे व ते त्वरित काढणे यासाठी दुकानदार चाणाक्ष झाल्याचे दिसून येते. महिन्याभरापूर्वी झालेल्या कारवाईनंतर आतातर अतिक्रमणाने चांगलाच हैदाेस केला आहे. चक्क मुख्याधिकाऱ्यांनी येथून आपले तरी वाहन काढून दाखवावे असा उपराेधीक प्रश्नही दुकानदार विचारतात. या बाबीवरुन अनेकदा तु-तु-मै-मै व हाणामारीही झाली आहे. कारवाई संदर्भाने प्रशासन एखाद्या अनुचित घटनेची तर वाट बघत नाही ना? असा सुरही येथे ऐकायवास मिळत आहे. यावर कारवाई हाेणे गरजेचे बनले आहे.