अतिक्रमण हटविले, विल्हेवाटीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:18 PM2018-06-29T22:18:18+5:302018-06-29T22:18:45+5:30

आठ दिवसांपूर्वी अड्याळ ग्रामपंचायत कार्यालयातून दुपारच्या वेळेला एक पत्र निघते त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरी घेतली जाते. दुसऱ्याच दिवशी जीर्ण इमारत तात्काळ पाडली जाते. परंतु त्यानंतर मात्र ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी तथा सदस्यांचे तेथील समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने अड्याळचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

Encroachment deleted, waiting for disposal | अतिक्रमण हटविले, विल्हेवाटीची प्रतीक्षा

अतिक्रमण हटविले, विल्हेवाटीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देप्रकरण अड्याळ येथील : गुजरी चौकातील जीर्ण इमारत पाडली

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : आठ दिवसांपूर्वी अड्याळ ग्रामपंचायत कार्यालयातून दुपारच्या वेळेला एक पत्र निघते त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरी घेतली जाते. दुसऱ्याच दिवशी जीर्ण इमारत तात्काळ पाडली जाते. परंतु त्यानंतर मात्र ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी तथा सदस्यांचे तेथील समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने अड्याळचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
अड्याळ गुजरी चौकाच्या बाजुला एक जीर्ण ईमारत पाडण्याचे पत्र सप्टेंबर २०१७ ला ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाले. त्यावेळी आठ महिन्यात एकालाही जाग आली नाही आणि जेव्हा जाग आली तेव्हा पुन्हा ग्रामस्थांनाच त्रास होत आहे. असेच चालत राहिले तर ग्रामस्थांनी करायचे तरी काय, जीर्ण ईमारतीचा मलबा आहे त्याच ठिकाणी आहे.
दुसरे महत्वाचे म्हणजे तेथील शौचालय मार्गावर सिमेंट काँक्रीटचा मलबा पडला असल्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे.
यामुळे नाली सुद्धा बंद झाल्यामुळे ग्रामस्थांच्या घरात, दारात दुर्गंधीयुक्त पाणी शिरत आहे. तिथे मांस व्यावसायीक बसायचे परंतु त्यांनाही कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाने जेवढ्या तातडीने एका दिवसात ईमारत पाडली तेवढ्याच दमाने तेथील मलब्याची विल्हेवाट, व्यावसायिकांची बसण्याची व्यवस्था लावायला पाहिजे होती परंतु आठ दिवस होऊनही ना मलबा हटला ना व्यावसायिकांना कायमस्वरूपची सोयी सुविधा पुरवायला ग्रामपंचायत एक पाऊल मागे का गेली. असा सवालही ग्रामस्थ करीत आहेत.

रस्त्यावर पडलेला मलबा लवकरच हटविण्यात येईल. शौचालय, व्यावसायीकांना बसण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
- प्रकाश मानापुरे,
उपसरपंच अड्याळ.

Web Title: Encroachment deleted, waiting for disposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.