अतिक्रमणधारकांचा पालिकेला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:35 AM2018-02-02T00:35:23+5:302018-02-02T00:35:52+5:30
पर्यायी व्यवस्था न करता सातत्याने अतिक्रमण धारकांची फुटपाथवरील दुकाने उचलून नेली जात आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गांधी चौकातील पालिका कार्यालयाला घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पर्यायी व्यवस्था न करता सातत्याने अतिक्रमण धारकांची फुटपाथवरील दुकाने उचलून नेली जात आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गांधी चौकातील पालिका कार्यालयाला घेराव घातला.
विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने जिल्हा परिषद चौकातील दुकाने हटविली. मात्र शहरातील अन्य ठिकाणातील अतिक्रमण काढले नाही. अतिक्रमण काढायचे असल्यास सर्वांचेच काढा परंतु अशा दुकानदारांना पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करून द्यावी, अशी रास्त मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी पालिका पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजीही केली.
पालिका प्रशासनाने यापुर्वीही पर्याय व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण काढणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र हेतुपुरस्परपणे एकाच मार्गावरील दुकाने जबरदस्तीने हटविण्यात आली.
पालिकेला घेराव घातला यावेळी प्रकाश चौधरी, अशोक क्षीरसागर, प्रेम खंगारे, राजेश मेश्राम, अरविंद माकडे, इमरोज खान, रमेश वाघमारे, अमर घोलपे, सुनिल घोलपे, सुनिल बोंदरे, दिनेश बांगडे, घनश्याम बोंदरे, सेवक क्षीरसागर, शमीम खान रफीक खान, विनोद डोरले, नरेंद्र अमनकर, फारूख खान, संतोष घोडमारे आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे या आंदोलनकर्त्यांनी लोकमत कार्यालय गाठून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आपबिती कथन केली.