सासऱ्याने केलेल्या अतिक्रमणाने सुनेचे सरपंचपद गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:05+5:30
लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला.
दयाल भोवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सासºयाने शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणाने सुनेचे सरपंचपद जाण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील तई बु. येथे घडला. अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी सदस्यत्व अपात्र घोषित केल्याने सुनेला सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला. अशातच शासकीय जागेवर सरपंच भाग्यश्री भेंडारकर यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा मुद्दा पुढे आला. गावातील मार्कंड वासूदेव सोनकुसरे यांनी १९ डिसेंबर २०१८ रोजी अप्पर जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली.
सदर प्रकरणात तक्रारदार व सरपंचांनी लेखी म्हणणे व युक्तीवाद सादर केला. याप्रकरणात सरपंच भाग्यश्री भेंडारकर संयुक्त कुटुंबात राहत असून त्यांचे सासरे गोपीचंद भेंडारकर अतिक्रमण करून शासकीय जागा वापरत असल्याचे सिद्ध झाले. त्यावरूव अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ ज (३) नुसार अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरपंच भाग्यश्री भेंडारकर यांना पायउतार व्हावे लागले. सासºयाच्या अतिक्रमणाचा फटका सुनेला बसला आहे.
तई बु. येथील शासकीय गट क्रमांक ४७६ आर ०.१४ हेक्टर पैकी ०.० हेक्टर आर जागेवर गोपीचंद भेंडारकर यांचे नाव नमुना ई पंजीका २००३ मध्ये नोंदविण्यात आला आहे. सरपंच संयुक्त कुटुंबात सासºयांसोबत राहतात. सासºयांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले. सरपंच हे अतिक्रमण करणाºया व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांना ही बाब लागू होत असल्याचे सिद्ध होत आहे. जागा सद्धस्थितीत नियमाकुल केलेली नाही. त्यावरून अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले.