जांभळी येथे झुडपी जंगलात अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:44 AM2018-08-03T00:44:34+5:302018-08-03T00:45:56+5:30
तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. मात्र झाडे कापून झाल्यानंतर मग संबंधित वनरक्षक झाडे कापेपर्यंत शांत कसा काय होता. हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांना माहिती मिळाली. त्यांनी ताफ्यासह घटनास्थळावर गाठले. जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एका इसमाने झुडपी जंगलातील येनाची आठ झाडे विनापरवानगीने कापून अतिक्रमण करताना दिसून आला. त्यावेळी जवळपास दहा ते अकरा लोक त्याठिकाणी झाडे कापत असताना दिसून आले. वनअधिकाऱ्यांनी सदर अकरा ते बारा लोकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई केली. मात्र शासकीय वनाचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शासन जंगलाच्या रक्षणाकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतो तर दुसरीकडे वनअधिकारीच जंगलाच्या रक्षणाकरिता दुर्लक्ष करताना दिसत आहेत. संबंधित इसमाने शासकीय जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनांचे संरक्षण करण्याकरिता शासनाने वनविभागाची स्थापना करण्यात आली. मात्र कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे स्थानिक वनकर्मचारीच जंगलाचे रक्षणकर्ते बनण्यापेक्षा भक्षणकर्ते बनण्याची साकोली तालुक्यात दिसून येत आहे.
कारवाई कुणावर?
संबंधितप्रकरणात झाडे कापणाऱ्यासह ज्यांनी अतिक्रमण केले असे एकुण १२ जणांचा समावेश आहे. मात्र वनविभाग आता कारवाई कोणावर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणाची गुप्तपणे माहिती मिळताच ताफ्यासह घटनास्थळ गाढून झाडे तोडणाºयांना ताब्यात घेतले व प्रकरणाची चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करून अहवाल वरिष्ठांना सादर करू.
-आर.बी. धोटे, वनपरिक्षेत्राधिकारी
सदर प्रकरणासंदर्भात माहिती प्राप्त झाली असून संबंधित चौकशी करीत आहोत. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करू.
-आरती उके, वनक्षेत्राधिकारी