ट्रॅक्टर मालकाचा अंत

By admin | Published: June 20, 2016 12:19 AM2016-06-20T00:19:57+5:302016-06-20T00:19:57+5:30

उभा असलेल्या ट्रॅक्टरची किल्ली काढत असतांना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु होऊन खाली उभा असलेल्या ट्रक्टर मालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला.

The end of the tractor owner | ट्रॅक्टर मालकाचा अंत

ट्रॅक्टर मालकाचा अंत

Next

शहापूर : उभा असलेल्या ट्रॅक्टरची किल्ली काढत असतांना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु होऊन खाली उभा असलेल्या ट्रक्टर मालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. मनोहर भगवान तितीरमारे (४५) रा. सालेबर्डी असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी पुनर्वसन येथील कवडसी फाट्यावर कवडसी गावाच्या दिशेने मनोहर भगवान तितीरमारे यांचा मालकीचा ट्रॅक्टर उभा करुन चालक व मजूर उपहारगृहात नास्ता करण्याकरतिा गेले होते. दरम्यान ट्रॅक्टर मालक तिथे आले असता किल्ली ट्रॅक्टरलाच लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते ट्रक्टर खाली उभे राहून ट्रॅक्टरची किल्ली काढत असतानाच ट्रॅक्टर अचानक सुरु झाला. ट्रॅक्टर गिअरमध्ये असल्याने वाहन त्यांच्या अंगावर आले. यात ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबल्या गेले. यात त्यांच जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही ट्रॅक्टर सुरुच असल्याने दिडशे ते दोनशे फुट पुढे जावून एका दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद पानटपरीला धडक देत एका बारच्या कडेला असलेल्या बांधीच्या धुऱ्यापर्यंत गेले. अपघातग्रस्त ट्रॅकटरच्या क्रमांकाचा शोध घेतला असता गाडीवरील क्रमांक दिसू शकला नाही. मात्र मागील ट्रेलरचा एम एच ३६ जी ४८४२ दिसत होता.
घटना राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारीच घडल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या अनपेक्षित व आकस्मिक घटनेने मात्र एका जणाचा नाहक जीव गेला. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The end of the tractor owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.