ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:14 PM2021-01-15T13:14:47+5:302021-01-15T13:15:07+5:30

Bhandara Fire ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली.

Energy Minister Dr. Inspection of Bhandara General Hospital by Nitin Raut | ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याकडून  घडलेल्या घटनेसंदर्भात विस्तृत माहिती घेतली. यावेळी आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, 
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, भंडारा मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यावेळी उपस्थित होते.
अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून वीज अभियंत्यांनी सविस्तर माहिती घेण्याचे निर्देश यावेळी उर्जामंत्र्यांनी दिले.

 भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यु झाला तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. 
या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून या समितीचा अहवाल तातडीने प्राप्त होणार आहे, असे श्री. राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. घटना अत्यंत दुर्दैवी असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Energy Minister Dr. Inspection of Bhandara General Hospital by Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.