नियमांची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:12 PM2018-06-29T22:12:33+5:302018-06-29T22:12:59+5:30
शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागणी पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे संचालक नत्थू खंडाईत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागणी पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे संचालक नत्थू खंडाईत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
पंचायतराज कृषी मंडळाकडून दोन टक्के कृषी त्यांना संपूर्ण सेवा सहकारी संस्थाना त्यांच्या वेतन, स्टेशनरी, भाडे, सचिवाचे वेतन, आदी खर्चाकरिता पुरवावा तो इतरत्र वळवू नये यासाठी शेतकरी कर्ज घेताना कर्जावर ठेव कपात करून ती बँकेत जमा केली जाते. त्यावर व्याज किंवा लाभांश देण्यात यावा. आतापर्यंत जिल्हा बँकेच्या नफ्यातून लाभांश शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. ठराविक काळात तो मंजुर झाल्याचे सांगून हितकारी धोरणाचा फज्जा उडवतात. प्रक्रिया सुरूच आहे. पूर्णत: निकाली निघालेली नाही. पण गावपातळीवर कर्जदार चालू हंगामाकरिता कर्जाकरिता दबाव आणित आहेत.
शासनाच्या आदेशाप्रमाणे बँकानी आपले धोरण स्पष्ट करावे व संस्थेला सहकार्य करावे, सेवा सहकारी संस्थेवर थकित कर्जदाराच्या कर्जाच्या व्याजासंबंधीचा टाकलेला बोझा तत्काळ कमी करावा, असेही निवेदनात नमूद आहे.
सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ नुसार लोकहितार्थ ३१ जुलै २०१७ नंतरच्या व्याजाची आकारणी बँकेनी मागे घेवून शासनाशी यासंबंधीचा पत्र व्यवहार करावा. जेणेकरून शेतकरी व संस्था टिकण्याला मोठी मदत होईल.
संबंधित विषयावर निवेदनधारकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. संस्था टिकण्याकरिता नेहमीच सहकार्याची भूमिका निभवल्या गेली आहे. शेतकरी हा बँकेचा कणा असून त्यांच्या उत्थानाकरिता बँक कटिबद्ध आहे.
-संजय बरडे, सर व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा