अपघातात अभियंते-कंत्राटदार बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:41 PM2018-09-17T22:41:31+5:302018-09-17T22:41:52+5:30
भरधाव पिकअप व्हॅनने कारला धडक दिल्याने देव्हाडी-रामटेक रस्त्यावर झालेल्या अपघातात रस्ता निरीक्षण करणारे अभियंता आणि कंत्राटदार सुदैवाने बचावले. हा अपघात तामसवाडी तुडमा फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भरधाव पिकअप व्हॅनने कारला धडक दिल्याने देव्हाडी-रामटेक रस्त्यावर झालेल्या अपघातात रस्ता निरीक्षण करणारे अभियंता आणि कंत्राटदार सुदैवाने बचावले. हा अपघात तामसवाडी तुडमा फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता घडला.
देव्हाडी येथून एम एच ०५ सीए ९५९४ या कारमध्ये बांधकाम विभागाचे अभियंता हत्तीमारे, अभियंते व कंत्राटदार जात होते. दरम्यान तामसवाडा फाट्याजवळ मागेहून आलेल्या पिकअप व्हॅन क्रमांक एम एच ३६ एफ ३५६१ ने कारला जोरदार धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. मात्र या वाहनातील अभियंते व कंत्राटदारांना दुखापत झाली नाही. अंतर दर्शविणारा दगड आडवा आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. असे मांढळचे उपसरपंच धनपाल शेंडे यांनी सांगितले. नशिब बलवत्तर म्हणून या अपघातातून कारमधील सर्वजण सुखरुप बचावले.