जिल्ह्यात इंग्रजी शाळांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:45 PM2019-02-25T22:45:39+5:302019-02-25T22:46:04+5:30
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ‘शाळा सुधार कायदा’ करावा या मागणीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यात सर्वचा सर्व शाळा बंद होत्या. इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल अशोसिएशन ‘ईसा’ च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ‘शाळा सुधार कायदा’ करावा या मागणीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यात सर्वचा सर्व शाळा बंद होत्या. इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल अशोसिएशन ‘ईसा’ च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
ईसा संघटनेच्यावतीने राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. त्याला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सोमवारी बंद होत्या. तर बोर्डाची परिक्षा असलेल्या शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काळा फिती लावून काम केले. त्यामुळे परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र शाळा बंद असल्याने शैक्षणिक कार्य होऊ शकले नाही.
१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय मागे घ्यावा, आरटी अंतर्गत थकीत फि परतावा दयावा, शाळा सुधार कायदा करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वैद्य, सचिव राजेश नंदपुरे, भंडारा तालुकाध्यक्ष अब्दुल शिध्दीकी, पवनी तालुकाध्यक्ष मनोज शांतलवार, तुमसर तालुकाध्यक्ष ईश्वर पेटकर, लाखनी तालुकाध्यक्ष रामचंद्र तोरणे, साकोली तालुकाध्यक्ष नरेश मेश्राम, हेमंत चांदवस्कर आदी उपस्थित होते.