‘त्या’ हॉस्पिटल प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:04 AM2019-06-17T01:04:33+5:302019-06-17T01:05:21+5:30

येथील तकीया वॉर्डात स्थित सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये १० जून रोजी चप्पल ठेवणारी रॅक अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूला हॉस्पीटल व्यवस्थापनाचा गलथान कारभार कारणीभूत असून हॉस्पीटलचा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत बालकाच्या वडीलांनी केली आहे.

Enter 'criminal hospital' criminal case | ‘त्या’ हॉस्पिटल प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करा

‘त्या’ हॉस्पिटल प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करा

Next
ठळक मुद्देप्रकरण बालकाच्या मृत्यूचे : पालकाची भंडारा पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील तकीया वॉर्डात स्थित सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये १० जून रोजी चप्पल ठेवणारी रॅक अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूला हॉस्पीटल व्यवस्थापनाचा गलथान कारभार कारणीभूत असून हॉस्पीटलचा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत बालकाच्या वडीलांनी केली आहे. याबाबतची तक्रार रविवारला (१६ जून) भंडारा पोलिसात करण्यात आली.
आर्यन गौरीशंकर अवचटे असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. १० जून रोजी गौरीशंकर अवचटे हे आपल्या पत्नी तसेच मुलगा आर्यन व मुलगी अवंती यांच्यासह भंडारा येथील सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये आले होते. अवचटे यांची सासू प्रतिभा विठ्ठलराव नखाते यांना पाहण्यासाठी ते आले होते.
त्यांना बघून झाल्यावर सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास परत जात असताना आर्यन हा चप्पल काढण्यासाठी रॅकजवळ गेला. यावेळी त्याचे वडील पार्र्किं गमधून कार बाहेर काढण्यासाठी गेले होते. याचदरम्यान चप्पल काढीत असताना आर्यनच्या अंगावर लोखंडी रॅक कोसळली.
यावेळी आर्यनच्या डोक्यावर जबर मार लागला. तसेच अवचटे यांच्या साळूभाऊ यांची मुलगी त्रिजा हिलाही किरकोळ मार लागला. त्याच दवाखान्यात आर्यनवर प्रथमोपचार करुन नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आर्यनचा मृत्यू झाला. हॉस्पीटल प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे सदर लोखंडी रॅक आर्यनच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यूला कारणीभूत ठरली.
याप्रकरणी आर्यनच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गौरीशंकर अवचटे यांनी केली आहे. आर्यन हा आई-वडीलाना एकुलता एक होता. अवचट कुटूंब अर्जुनी मोरगाव येथील असून त्यांच्या कुटूंबीयांवर आर्यनच्या अचानक मृत्यूने दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. सदर लोखंडी रॅक अत्यंत वजनी असून त्याला हलविल्यामुळेच बालकाच्या अंगावर कोसळली. हॉस्पीटलच्या गार्डनेही याबाबत मुलाला व संबंधितांना सांगितले होते. सदर रॅक अंगावर कोसळेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. हॉस्पीटल प्रशासन नेहमी रुग्ण तथा रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी घेण्यासंदर्भात दक्ष असते. याबाबत अवचटे कुटूंबीयांशीही आम्ही चर्चा केली आहे.
- डॉ. मनोज चव्हाण,
सिटीकेअर हॉस्पीटल भंडारा

Web Title: Enter 'criminal hospital' criminal case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.