‘त्या’ कंत्राटदारावर 'एफआयआर' दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:18 AM2018-03-30T01:18:38+5:302018-03-30T01:18:38+5:30

येथील नगरपरिषदेअंतर्गत करण्यात येणाºया रस्त्यावरील खोदकामातून निघालेल्या गलबा संबधीत कंत्राटदाराने नगरपरिषदेने ठवून दिलेल्या ठिकाणी न टाकता इतरत्र टाकण्यात आला.

Enter 'FIR' on 'that contractor' | ‘त्या’ कंत्राटदारावर 'एफआयआर' दाखल करा

‘त्या’ कंत्राटदारावर 'एफआयआर' दाखल करा

Next
ठळक मुद्देअनीता पोगडे यांची मागणी : मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार, प्रकरण रस्त्यावरील मलिद्याचे

ऑनलाईन लोकमत
साकोली : येथील नगरपरिषदेअंतर्गत करण्यात येणाºया रस्त्यावरील खोदकामातून निघालेल्या गलबा संबधीत कंत्राटदाराने नगरपरिषदेने ठवून दिलेल्या ठिकाणी न टाकता इतरत्र टाकण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत कंत्राटदारावर एफआयआर दाखल करुन काम बंद करण्याची मागणी नगरसेविका अनीता पोगडे यांनी मुख्याधिकारी यांना तक्रारीतून केली आहे.
या तक्रारीप्रमाणे प्रभाग क्रमांक ४ मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत वलथरे ते चांदेवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यांचे बांधकामाचे कंत्राट योगेशकुमार बिसेन यांना देण्यात आले आहे. या आज पाहणी केली असता सदर रस्त्याचे खोदकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नव्हते. व तिथे झालेल्या खोदकामाचा मलबा सकस आहार येथे टाकावयाचा होता. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा मलबा तिथे न टाकता इमारत विकल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत कंत्राटदारावर एफआयआर दाखल करुन झालेल्या प्रकरणाची योग्य माहिती मीळत नाही तो पर्यंत सदर काम बंद करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्या कंत्राटदारावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित रस्त्यावरील खोदकामातील स्क्रब साहित्ये हे नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागीच टाकावयाचे होते. मात्र कत्राटदरांना लेखी सूचना देऊनही त्यांनी स्क्रब मटेरियल स्वत:च्या मर्जीने इतरत्र नेऊन टाकले या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई झाली पाहिजे.
-तरुण मल्लाणी, उपाध्यक्ष
संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कार्यवाही करु.
-अरविंद हिगे, प्रभारी मुख्याधिकारी न.प.साकोली

Web Title: Enter 'FIR' on 'that contractor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.