रचियता साहित्य मंचतर्फे कवी संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:58+5:302021-02-07T04:32:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : रचियता साहित्य मंचच्यावतीने भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रचियता साहित्य मंचच्यावतीने भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात नवोदित कवींनी सहभागी होत आपल्या साहित्य कृतींचे सादरीकरण केले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री स्मिता किडीले होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शैलेंद्र गभणे (औरंगाबाद), वामन गुर्वे (भंडारा), सिद्धार्थ चौधरी आणि रचियता साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष गोपाल फुलउंबरकर उपस्थित होते. मराठी अस्मिता जोपासत फेटे बांधून काव्य संमेलनाला सुरूवात झाली. या संमेलनात ४० कवयित्रींनी सहभाग घेतला. सामाजिक, प्रेम, विनोदी, निसर्ग, नारीशक्ती आदी विषयांवरील कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या संमेलनात औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील कवयित्री सहभागी झाल्या होत्या. प्रास्ताविक मोहिनी निनावे यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना गुर्वे आणि स्वाती सेलोकर यांनी केले. स्वागतगीत मंगला डहाके, पूनम डहाके यांनी सादर केले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता लिलाधर दवंडे, उषा घोडेस्वार, अर्चना गुर्वे, वामन गुर्वे, स्वाती सेलोकर, प्रतिमा थोटे, कमल सुर्वे, सुभाष पडोळे, मीरा शेबे, मेघा भांडारकर, कविता कठाणे, मंगला डहाके, पूनम डहाके, उषा घोडेस्वार, शिलवंत घोडेस्वार, मोहिनी निनावे यांनी सहकार्य केले.