लसीकरण मोहिमेला तरुणांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:20+5:302021-06-27T04:23:20+5:30
यावेळी सरपंच प्रीती गेडाम, उपसरपंच धनंजय घाटबांधे, आरोग्यसेवक प्रमोद फोपसे, आरोग्यसेविका अस्मिता रामटेके, शिक्षक ब्रिजलाल ढवळे, शिक्षक विवेक कुंभरे, ...
यावेळी सरपंच प्रीती गेडाम, उपसरपंच धनंजय घाटबांधे, आरोग्यसेवक प्रमोद फोपसे, आरोग्यसेविका अस्मिता रामटेके, शिक्षक ब्रिजलाल ढवळे, शिक्षक विवेक कुंभरे, मदतनीस छबिला कुंभारे, ग्रामपंचायत चपराशी कैलास नान्हे, आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन व सोबत आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक केले आहे.
लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निश्चित केलेली आहे. लसीकरणासाठी येताना भरपेट जेवण करून यावे. लसीकरणाचा दुसरा डोस ८४ दिवसांनी देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर ताप, थकवा किंवा प्रकृतीत त्रास जाणवल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. कोविड लस अत्यंत सुरक्षित असून खोट्या प्रचाराला बळी न पडता तरुणांनी लसीकरण करावे. शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. लसीकरणानंतरही मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करावा. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची प्रत्येक तरुणाने खबरदारी घ्यावी. मास्क वापरून प्रवेश करावा, आदी सूचना यावेळी देण्यात आल्या. लसीकरणासाठी येणाऱ्या तरुणांत उत्साह व उत्कंठा पाहायला मिळाली.