सोरणा शाळेचा अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:57+5:302021-06-26T04:24:57+5:30
शाळेचे मुख्याध्यापक सी. सी. मेश्राम व सहायक शिक्षक कैलास चव्हाण यांच्या कल्पनेतून सहा वर्षे पूर्ण झालेल्या भरती पात्र ...
शाळेचे मुख्याध्यापक सी. सी. मेश्राम व सहायक शिक्षक कैलास चव्हाण यांच्या कल्पनेतून सहा वर्षे पूर्ण झालेल्या भरती पात्र बालकांना शाळेत न बोलावता प्रत्येक बालकाच्या घरी जाऊन हा ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. ज्यात बालकांना प्रवेश निश्चिती प्रमाणपत्र व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सरिता प्रेमलाल राठोड, उपसरपंच धुपेंद्र उचिबगले, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र चौरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मैताब राठोड, उपाध्यक्ष सोनाली चौरे आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध उपक्रम व गावकऱ्यांच्या सहकार्याने गत तीन वर्षांपासून गावातील एकही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत जात नाही. तर १०० टक्के विद्यार्थी गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित आहेत.