एसटी महामंडळाच्या ताफ्यात महाकार्गोची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:46+5:302021-05-04T04:15:46+5:30
मोहन भोयर तुमसर: एसटी महामंडळाने मालवाहतुकीचे नामकरण महाकार्गो असे केले असून, तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाला एक वर्षापासून मालवाहतूक महसूल ...
मोहन भोयर
तुमसर: एसटी महामंडळाने मालवाहतुकीचे नामकरण महाकार्गो असे केले असून, तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाला एक वर्षापासून मालवाहतूक महसूल मिळवून देत आहे. तुमसर आगाराला तीन महाकार्गो मिळाले असून, सध्या एक महाकार्गो सेवेत दाखल झाला आहे. दहा टन क्षमता आहे.
तुमसर आगाराला गत वर्षभरात अडीच ते तीन लाख रुपयांचा महसूल या मालवाहतूक ट्रक मिळवून दिला होता. स्थानिक व्यापारी, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या मालवाहतुकीचा उपयोग केला होता.
गत लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाने तूट भरून काढण्याकरिता मालवाहतूक सेवा सुरू केली होती. आगारांमध्ये असलेल्या वाहनांचा माल वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आला. महामंडळाला त्यातून आर्थिक फायदा झाला. संपूर्ण राज्यामध्ये ही वाहतूक सुरू करण्यात आली. आता एसटी महामंडळाने मागील मालवाहतूक ट्रक लाच महाकार्गो हे नाव दिले. एसटीच्या ट्रकला नवीन रंग देण्यात आले. त्यामुळे ते अतिशय देखणे दिसते. तुमसर आगारात सध्या एक महा कार्गो दाखल झाला असून, इतर दोन महा कार्गो लवकरच दाखल होणार आहेत. या आगाराला तीन महा कार्गो एसटी महामंडळाने मंजूर केले आहे.
बॉक्स
बस वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी
कोनानाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे एसटीच्या फेऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आता बसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी आह. त्यामुळे बस स्थानकावर १५ अशी प्रवासी जमा झाल्यानंतरच बस सोडण्यात येते. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा पत्ता नसतो. कुणाला महत्त्वाच्या कामसाठी गावी जायचे असेल, तर खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही.
कोट
तुमसर आगारात मालवाहतुकीसाठी महाकार्गो ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी मालवाहतूक ट्रक होते. त्यांचे नामकरण आता महाकार्गो असे करण्यात आले आहे. त्याची दहा टन क्षमता असून, किलोमीटर प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येते.
युधिष्ठिर रामचौरे, आगार प्रमुख तुमसर