तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा विकास ठप्प

By Admin | Published: November 16, 2016 12:44 AM2016-11-16T00:44:19+5:302016-11-16T00:44:19+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे.

In the era of technology, the farmers' growth jammed | तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा विकास ठप्प

तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा विकास ठप्प

googlenewsNext

शेती झाली महाग : ग्रामीण भागातही यंत्राने धान कापणी, महिला शेतमजूरांची कामासाठी भटकंती
जवाहरनगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार. तो ही पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्यांना फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी मनुष्यबळाचा, बैलांचा वापर करून शेतातील वखरणी, नांगरणीपासून धान कापणीपर्यंत कामे होत होती. यात शेतकरी, महिला शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या दणकट होता. त्यासोबत योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहेत. शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाच्या उपयोेग करीत कमी कष्टाळू झाली. पूर्वी बैलांच्या मदतीने शेताची वखरणी करण्यासाठी सहा सात दिवस लागायचे. शेताच्या कामावर असणारा पहाटेच शेतात जाऊन वखर जुंपायचा. माळरानावरून शेतकऱ्याची पत्नी हाक मारीत ‘अवं धनी, चटनी भाकर खायला या हो’ अशी सकाळी १०-११ च्या दरम्या आवाज शेतारानात घोंगायचा. आणलेली शिदोरी आपल्या बायकोसोबत सकाळची न्याहारी करायचा. यावेळी बैलालाही थोडा वेळ विश्रांती देऊन त्याला चारापाणी दिला जायचा. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की वखर मांडवात आणून थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. सायंकाळी परत ४ वाजेपासून त्याचे वखरणीचे काम सुरु व्हायचे तर पेरणी करण्यासाठी महिला मजुरांची शेताबांधाकडे एकच गर्दी दिसायची. नवनवीन कौटुंबिक गाणी कानावर पडायचे. दिवाळी झाली की पुन्हा गर्दीचा लोंढा शेता बांधावर दिसायचा. चरचर अशा उभ्या धान पिकाचा कापणीचा आवाज धान व विळा दरम्यान ऐकू यावयाचा. परंतु ते चित्र आज दिसेनासे झाले आहे. आज सामान्यातला सामान्य शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी कापणी करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे पैशाची तसेच वेळेचीही बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुरांची कमतरता हे सुद्धा कारण यांना कारणीभूत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे बळकट राहले नाही. वा वयमान घटत आहे. वखरणी झाल्यानंतर पेरणी, निंदन, खुरपणी, कीटकनाशकाची फवारणी व कापणी ही सर्व आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे. शेतारानात चिमण्या पाखरांचा घोंगावणारा आवाज यंत्रणाच्या आवाजात दबलेला आहे. माळरानातून शेतकऱ्याच्या पत्नीचे गाणे नाहीसे झाले. एवढे सर्व करूनही शेतकऱ्यांचा विकास पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही. खताचा वारेमाप तणनाशक जळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहिशी झाली. परिणामी निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. यातच शासनाचे दुर्लक्ष व शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्वीच्या परिस्थितीत होता. आजही त्याच अवस्थेत दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: In the era of technology, the farmers' growth jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.