बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:37+5:302021-04-20T04:36:37+5:30
या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत ...
या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठाबाबत शेतकरी, उत्पादक, वाहतूकदार व वितरक, विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या अडचणी, तक्रारी देता येणार आहेत. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नियंत्रण कक्ष सुरू असणार आहे. यामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी नामदेव धांडे यांच्याकडे शेतकऱ्यांना थेट भेटून अथवा कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयाच्या मेलवर ऑनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारीबाबत प्रत्येकाच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या नावासह तक्रार नोंदविण्याची गरज असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले आहे.
बॉक्स
नियंत्रण कक्षातील हे आहेत अधिकारी, कर्मचारी
गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर कृषी विभागाच्या वतीने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शेतकऱ्यांना संपर्क साधता येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी नामदेव धांडे, तंत्र अधिकारी मनीषा पाटील, व्ही. ए. चौधरी, जे. बी. उबाळे, चंद्रकांत कापगते, कृषी सहायक सुनीता मंचरे, एस. टी. पुडके, व्ही. .आर. कापगते, एस. पी. थुलकर असे दहा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ा