जिल्ह्यात पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:23 PM2018-10-09T22:23:29+5:302018-10-09T22:24:07+5:30

आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरभर रोषणाई करण्यात आली असून मातेच्या जागृत स्थळांवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक सार्वजनिक दुर्गोत्सवाची स्थापना करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात मातेच्या जयकाराने आसमंत दुमदुमणार आहे.

Establishment of Jyoti Kalash at five thousand in the district | जिल्ह्यात पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना

जिल्ह्यात पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देआजपासून नवरात्रोत्सव : विविध धार्मिक कार्यक्रम, शहरभर रोषणाई

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरभर रोषणाई करण्यात आली असून मातेच्या जागृत स्थळांवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक सार्वजनिक दुर्गोत्सवाची स्थापना करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात मातेच्या जयकाराने आसमंत दुमदुमणार आहे.
गणेशोत्सवानंतर भक्तांना आस लागते ती नवरोत्रात्सवाची. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात संपूर्ण शहर भक्तीमय होऊन जाते. भंडारा शहराची ग्राम रक्षक देवता शितलामाता मंदिरात नवरोत्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरु झाली आहे. यापरिसरात रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात मंगळवारी सायंकाळीपर्यंत १३०१ ज्योती कलश स्थापनेची नोंदणी करण्यात आली होती. बुधवारपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. संपूर्ण शहरवासीय नवरात्रोत्सव काळात शितलामातेचा आशिर्वाद घेण्यासाठी याठिकाणी गर्दी करुन असतात. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येथे नऊही दिवस केले जातात. मोठा बाजार परिसरातील प्रसिध्द अन्नपुर्णा दुर्गा माता देवस्थानात ३०१ ज्योती कलशाची स्थापना केली जाणार आहे. हा परिसरही बुधवारपासून गजबजणार आहे. जलाराम चौकातील अंबाई-निंबाई येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यासोबत मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील माता चौण्डेश्वरी देवस्थान आणि कोरंभी येथील पिंगलेश्वरी देवस्थानातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे.
यासोबतच शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ३५० पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळाची नोंदणी करण्यात आली आहे. भंडारा शहरातील गांधी चौकातील प्रसिध्द दुर्गोत्सव मंडळ आणि राजीव गांधी चौकातील मॉ बम्लेश्वरी दुर्गाेत्सव मंडळाने देखावे साकारले आहे. नऊ दिवस मातेचा जागर सुरु राहणार असून भाविक भक्त आपली मनोकामना पुर्ण करण्यासाठी मातेच्या चरणी लिन होणार आहे.
दुर्गोत्सवाच्या काळात कायद्या व सुव्यवस्था आबादीत राहण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव आठ दिवसांचा
नवरात्रोत्सव म्हटला की, नऊ दिवस उत्सव असतो. परंतु यावर्षी बुधवारी घटस्थापना होत असून बुधवार १७ आॅक्टोबर रोजी विसर्जन होणार आहे. या आठ दिवसात शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे. यासोबत अनेक भाविकभक्त मातेच्या दर्शनासाठी जागृत स्थळावर जाणार आहेत. एकंदरीत भंडारा शहरात मातेचा जयकारा दुमदुमणार आहे.

Web Title: Establishment of Jyoti Kalash at five thousand in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.