कमी वयात लग्न कर म्हणून लहान पोरीलाही रोज होतेय मारहाण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:54 IST2025-01-29T12:53:59+5:302025-01-29T12:54:27+5:30
Bhandara : चाइल्ड हेल्पलाइनसाठी १०९८ ला करा कॉल

Even a young girl is being beaten up every day for getting married at a young age!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी १०९८ या क्रमांकावर चाइल्ड हेल्पलाइन सेवा २४ तास उपलब्ध होत आहे. यात बालविवाह, मारहाण, हरवलेली मुले आदींसंदर्भातील तक्रारी येतात. मागील वर्षभरात अशा संकटात असलेल्या अनेक बालकांना 'चाइल्ड लाइन'ने मदतीचा हात दिला आहे.
माहितीनुसार १०९८ हा टोल फ्री टेलि-हेल्पलाइन नंबर चाइल्ड हेल्पलाइन नंबर म्हणून चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने १९९६ मध्ये तयार केला होता. संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव व सर्वात व्यापक अशी २४ तास सुरू असणारी फोन सेवा आहे. याचा लाभ घेत यामधील सुविधा त्यांना वेळेवर मिळू शकतात. याबाबत प्रभावी जनजागृतीची गरज आहे.
सखींना मानसिक आधार
महिलांसाठी असलेल्या १८१ या हेल्पलाइनच्या माध्यमातून मागील वर्षभरात काही महिला तथा बालकांना संरक्षण देण्यासाठी मदतीचे ठरले आहे.
यासोबतच महिला व बालकल्याण विभागामार्फत सखींना मानसिक आधार देण्याचे मोलाचे कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेली लहान मुले, मुली याच्यासाठी १०९८ यावर तर महिलांसाठी १८१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
संरक्षणाचे कार्य
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालक व महिलांच्या संरक्षणाचे कार्य केले जाते. यात पीडितांना संरक्षण न्याय, विधिसेवा आदी मदत केली जाते. कोणी पीडित मुलगा, मुलगी आढळल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तर अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी १८१ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. मागील वर्षभरात लैंगिक शोषणाच्या काही तक्रारी आल्या आहेत. मागील काही वर्षांच्या विचार केल्यास या तक्रारीमध्ये वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
चाइल्ड हेल्पलाइनसाठी १०९८ ला करा कॉल
० ते १८ वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालकांसाठी १०२८ या हेल्पलाइनवर कॉल केल्यास मदत मिळत असते.