भरपूर पावसानंतरही मेथी ६० रुपये पालक पंधरा रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:08+5:302021-08-12T04:40:08+5:30
बॉक्स नागपूर जिल्ह्यातून येतो भाजीपाला... भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र मेथी, पालक भाज्यासाठी मात्र आजही जिल्ह्याला ...
बॉक्स
नागपूर जिल्ह्यातून येतो भाजीपाला...
भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र मेथी, पालक भाज्यासाठी मात्र आजही जिल्ह्याला इतर जिल्ह्यावर अवलंबून रहावे लागत आहे. फळभाज्या आणि या नागपूरवरून येतात. पावसाळ्यानंतर पालेभाज्यांचे दर वाढलेले दिसून येतात. त्यामुळे पालेभाज्या खाण्याचे प्रमाणही कमी केले आहे.
गृहिणी म्हणतात...
कोट
आधी दोनशे रुपयांत आठवड्याचा भाजीपाला येत होता. मात्र आता दोनशे रुपयांचा भाजीपाला दोन दिवसही पुरत नाही.
सरकारने वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
संगीता गिरीपुंजे, गृहिणी
पालेभाज्यांचे दर हे वाढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती तेवढी रक्कम जात नाही. यातून व्यापारी वर्गच मोठा होत आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करायला हव्यात. महागाई आपेआप कमी होईल.
वंदना वैद्य, गृहिणी
व्यापारी म्हणतात...
कोट
आम्ही अनेक दिवसांपासून भाजीपाला व्यवसाय सुरू केला आहे. भाजीपाला व्यवसायात अनेकदा तोटाही सहन करावा लागतो. अनेकदा आहे त्याच दरातही विक्री करावी लागते. सर्वच खर्च वाढल्याने भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत.
भंडारा.
महिला व्यापारी
कोट
आम्ही बाजारातून भाजी खरेदी करतो. आम्हाला ज्या दराने भाजीपाला मिळतो. त्यापेक्षा दोन रुपये, पाच रुपये जास्त दराने विक्री करावी लागते अन्यथा आमचे पोट कसे भरणार.
विनोद वाडीभस्मे,