दीड वर्षानंतरही शहीद स्मारकाचा थांगपत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:46 PM2019-06-29T22:46:02+5:302019-06-29T22:46:19+5:30

पाकिस्तानी सैन्याने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफूल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. ३० जून रोजी मेजर प्रफूल्लचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त वीर शहिदाचे स्मरण केले जाईल. परंतू दुर्भाग्यपूर्ण घटनेला दिड वर्षाचा कालावधी लोटला तरीही नगरात हुतात्मा मेजर प्रफूल्लचे स्मरणार्थ स्मारक उभे होऊ शकले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अनास्थेमुळे शहीद सुपूत्राचे स्मरणार्थ स्मारक उभारले जाईल हे जिल्हावासीयांचे स्वप्न दिड वर्षानंतरही पूर्ण होवू शकले नाही.

Even after one and a half year, there is no tag mark of martyr monument | दीड वर्षानंतरही शहीद स्मारकाचा थांगपत्ता नाही

दीड वर्षानंतरही शहीद स्मारकाचा थांगपत्ता नाही

Next
ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था। पवनीतील शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचा आज जन्मदिन

अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पाकिस्तानी सैन्याने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफूल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. ३० जून रोजी मेजर प्रफूल्लचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त वीर शहिदाचे स्मरण केले जाईल. परंतू दुर्भाग्यपूर्ण घटनेला दिड वर्षाचा कालावधी लोटला तरीही नगरात हुतात्मा मेजर प्रफूल्लचे स्मरणार्थ स्मारक उभे होऊ शकले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अनास्थेमुळे शहीद सुपूत्राचे स्मरणार्थ स्मारक उभारले जाईल हे जिल्हावासीयांचे स्वप्न दिड वर्षानंतरही पूर्ण होवू शकले नाही.
स्मारक उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने शहीद मेजर प्रफूल्लचे अस्थी कलश कुटूंबीयांकडून प्राप्त करून नगर परिषद कार्यालयात सन्मानपूर्वक वर्षभर ठेवले होते.पहिल्या पुण्यस्मरण दिनापर्यंत स्मारक उभारण्याचे कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे प्रतिक्षा किती करावी, असा विचार करून आई सुधाताई मोहरकर, वडील अंबादास मोहरकर व कुटूंबीयांनी पालिका प्रशासनाकडून अस्थी कलश परत घेवून मेजर प्रफूल्लच्या अस्थी विधीपूर्वक वैनगंगा नदिवरील पवित्र वैजेश्वर घाटावर विसर्जित केल्या. या घटनेला सहा महिने लोटले तरीही पालिका प्रशासनाने शहिद स्मारकाचे उभारणीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
शहिद मेजर प्रफूल्ल मोहरकर भंडारा जिल्ह्यातील पवनीचे सुपूत्र असल्याने त्यांचे देशासाठी झालेले बलिदान सदैव जिल्हावासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल, यासाठी शहिद स्मारकाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्मारक उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडून होत असलेली दफ्तर दिरंगाई हा चिंतनाचा विषय बनलेला आहे. मेजर प्रफूल्ल यांचे वीर मरणाचे द्वितीय स्मरण दिनापर्यंत सुरूवात व्हायला हवी असे पवनीवासीयांचे मनात आहे. पालिका प्रशासन व निधी उपलब्ध करून देऊ शकणारे लोकप्रतिनिधी नागरिकांचे भावनेचा आदर करून स्मारक उभारण्याचे कामाला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Even after one and a half year, there is no tag mark of martyr monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.