लोकार्पणाआधीच तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडा कोसळल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:33 AM2024-09-12T11:33:40+5:302024-09-12T11:35:08+5:30

ओव्हरलोड वाहतुकीचा बसला फटका : अपघाताची शक्यता बळावली

Even before the inauguration, the edges of the road on the Tumsar - Gondia National Highway collapsed! | लोकार्पणाआधीच तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडा कोसळल्या!

Even before the inauguration, the edges of the road on the Tumsar - Gondia National Highway collapsed!

मोहन भोयर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
तुमसर :
मनसर-गोंदिया-बालाघाट हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग तयार होऊन सुमारे दीड वर्ष झाले. उसर्रा शिवारातील नवीन पुलाजवळील मातीच्या कडा कोसळल्या असून, येथे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने त्या कोसळल्या असे समजते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे. येथे अपघाताची प्रतीक्षा तर महामार्ग प्राधिकरण करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मनसर -रामटेक-तुमसर -गोंदिया बालाघाट असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या असून, उसर्रा शिवारात मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कडा कोसळल्या आहेत. या रस्त्यावरून जड वाहतूक चोवीस तास सुरू राहते. त्यामुळेच या रस्त्याच्या कडा कोसळल्या अशी माहिती पुढे आली आहे. अजूनपर्यंत रस्त्याचे लोकार्पण झालेले नाही, हे विशेष. 


रखडले होते काम 
उसर्रा शिवारात उंच पुलामुळे शेतकऱ्यांनी काम बंद केले होते. त्याकरिता आंदोलनही करण्यात आले होते. याबाबत न्यायालयातही काही शेतकरी गेले होते. काही दिवसांपूर्वी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे बांधकाम केले. परंतु, या मातीच्या कडा आता कोसळायला सुरुवात झाली आहे. या महामार्गाने कोळशाचे ट्रक मोठ्या प्रमाणात धावतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कडा कोसळल्याचे स्पष्ट दिसत असूनही अजून येथे महामार्ग प्राधिकरणाने गंभीरतेने घेतले नाही. राष्ट्रीय अधिक माहिती साठी QR कोड स्कॅन करा https://maa.ac.in/GermanyEmployment/ जर्मनी मध्ये नोकरीची संधी जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नवीन संस्कृती यांचा आनंद घेण्याची इच्छा असेल. महामार्ग प्राधिकरण रस्ता बांधकाम व सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देते असे सांगण्यात येते, परंतु येथील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


"महाराष्ट्र-मध्य प्रदेशला जोडणारा मनसर-बालाघाट हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गाच्या उसर्रा शिवारात कड़ा कोसळल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अपघातापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे." 
- अनिल बावनकर, माजी आमदार, तुमसर

Web Title: Even before the inauguration, the edges of the road on the Tumsar - Gondia National Highway collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.