प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

By admin | Published: August 4, 2016 12:32 AM2016-08-04T00:32:21+5:302016-08-04T00:32:21+5:30

तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.

Even if the project is filled, there is no water for irrigation | प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

Next

सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा : १६ तासांच्या भारनियमनाने शेतकरी हवालदिल
संजय साठवणे साकोली
तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे तिन्ही प्रकल्प तुडूंब भरले असले तरी या पाण्याचा सिंचनासाठी काही एक उपयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे शेतकरी १६ तासाच्या भारनियमनामुळे त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांनी जगाव तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
साकोली तालुक्यात तीन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात चुलबंद नदीवरील निम्न चुलबंद प्रकल्प, दुसरा वडेगाव येथील भीमलकसा प्रकल्प व तिसरा घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प यातील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम मागील वीस वर्षापासून सुरु असून आतापर्यंत या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून या प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र ज्या कालव्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचे पाणी तलावात जावू शेतात जाणार आहे. ते कालवेच अपूर्ण आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आलेले संपूर्ण पाणी वाया गेले ही या प्रकल्पाची शोकांतिका आहे.
साकोलीपासून अवघ्या पंधरा किलोेमिटर अंतरावर असलेल्या भिमलकसा प्रकल्प हा वनराईने नटलेला असून या प्रकल्पाच्या चारही बाजूने पहाड्या आहेत. या प्रकल्पात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र शासनाच्या अपूर्ण कामामुळे या प्रकल्पाची पाळ दोन तीन वर्षातून एकदा तरी फुटून संपूर्ण परिसरातील पाणी शेतात घुसून धानपिकाची नासाडी करते. मग गावकरीच लोकवर्गणी करून त्याची डागडुजी करतात. यावर्षी हाही तलाव तुडूंब भरला असून जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याही प्रकल्पाच्या कालवे तयार नसल्याने हे पाणी सिंचनासाठी उपयोगातच आणता येत नाही. ही सुद्धा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तिसरा भुरेजंगी प्रकल्प निसर्गाच्या सानिध्यात असून हाही प्रकल्प भरला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्यामुळे हे याही प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर सिंचनासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

भारनियमनाने शेतकरी त्रस्त
तालुक्यातील सिंचनाची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेवून किंवा जसे जमेल तशी जुळवाजुळव करून विहिरी व बोअरवेल केल्या. मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात १६ तासाचे भारनियमन सुरु असल्यामुळे या विहिरी व बोअरवेलचाही सिंचनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
निवडणुकीच्या वेळी मतांचे जोगवे मागणाऱ्या लोकप्रतिनिधी आता शेतकऱ्यांचे हाल दिसत नाही का? न भुतो न भविष्यती असे पावसाळ्यात भारनियमन यावर्षी सुरु झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी जरी दुर्लक्ष केले तरी लोकप्रतिनिधी तरी दुर्लक्ष करू नये अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Even if the project is filled, there is no water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.