अखेर मद्य विक्रीची दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:53+5:30
कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्यविक्री दुकाने संबंधित नमुना अंतर्गत शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी व निवासी संकुलातील परवानाधारक दुकाने सुरु करता येणार आहेत. सीलबंद मद्यविक्री करणाºया दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक एकाच वेळी राहू नये तसेच दोन ग्राहकांमध्ये सहा फुट अंतर अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मद्यनिर्मिती व विक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये दारु दुकाने उघडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातही अटी व शर्तीला प्राधान्य देत मद्यविक्रीची दुकाने उघडण्यात आली. शहरात बिअर शॉपी तर ग्रामीण भागातील काही ठिकाणी घाऊक विक्रेते यांचे व्यवहार सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोन वगळून इतर मद्य निर्मिती व विक्रीच्या परवानाधारक दुकाने सुरु करण्याचे आदेश आहेत.
मद्यनिर्मिती अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व मद्य निर्माण्या सुरु झाल्या आहेत. यात काम करणाऱ्या कामगारांची थर्मल स्कॅनिंग करणे तसेच फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणाºयाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्यविक्री दुकाने संबंधित नमुना अंतर्गत शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी व निवासी संकुलातील परवानाधारक दुकाने सुरु करता येणार आहेत. सीलबंद मद्यविक्री करणाºया दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक एकाच वेळी राहू नये तसेच दोन ग्राहकांमध्ये सहा फुट अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. मागणी पत्राचा नमुना भरल्यावरच संबंधित इसमाला मद्यविक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार बिअर शॉपी सुरु असून ग्रामीण भागातील देशी दारु दुकान सुरु असल्याची माहिती आहे.
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोसरा येथे देशी दारुचे दुकान दुपारी १ वाजता सुरु झाले. त्यामध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. सर्व ग्राहक लांब रांगा करून फिजीकल डिस्टन्सिंग ठेवून उभे आढळले.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दीड महिन्यातून प्रथमच देश्ी दारुचे दुकान आज सुरु झाले. त्यामुळे मद्यपी शौकीन लोकांनी सुटकेचाश्वास सोडत सकाळी १० पासून दुकानासमोर गर्दी केली होती. येथील देशी दारु दुकानाच्या चालकांनी एक दिवसाअगोदर सर्व तयारी केली. दुकानात प्रवेश करण्यसाठी व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार केले होते. ग्राहक शांततेत सर्कलमध्ये उभे राहत एकामागे उभे असल्याचे दिसले. ग्राहकांना दुकानाच्या आतमध्ये थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था देखील केली आढळले.
भंडारा : विना पास परवाना देशी दारु वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही वाहतूक करीत असलेल्या दोन जणांना लाखांदूर पोलिसांनी पकडले. ही कारवाई लाखांदूर तालुक्यातील सोनी चेकपोस्ट येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली. सदर दोन्ही इसम त्यांच्या दुचाकीने देशी दारुचे पव्वे घेऊन जात होते. चेक पोस्टवर तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून आठ नग बॉटल आढळले. या प्रकरणी पोलिसांनी संतोष गोपीचंद दिघोरे व अमीत देवीदास दिघोरे दोन्ही रा.चप्राड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नायक मातेरे करीत आहेत.
लाखांदूर : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर येथील बिअर शॉपी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरु करण्यात आली. दुकानात येणाºया ग्राहकांना सॅनिटायझर देऊन हात धुण्यास सांगण्यात आले.
दरामध्ये फरक
देशी दारुच्या लहान सीलबंद बॉटल विक्रीच्या दरामध्ये फरक असल्याचे नागरिक बोलत आहेत. या बॉटलवर ५२ रुपये किंमत लिहिली असताना कुठे ही बॉटल ५५ तर कुठे ७० रुपये या दराने विकली जात आहे. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातील साकोली येथील बिअर शॉपी उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळताच दुकानाच्या परिसरात मद्यप्रेमींची मोठी गर्दी झाली. भंडारा शहरातही गर्दी बघायला मिळाली. यातून मात्र लूट होत असल्याचेही दिसून येत आहे.
यावेळी इलेक्ट्रॉनिक थर्मामिटरने ग्राहकाची तपासणी करण्यात आली. यानंतर नोंदणी करून दारुची विक्री करण्यात आली. देशी दारु दुकानात बांबू लावून विशिष्ट अंतरावर ग्राहकांना उभे करण्यात आले होते. वृत्त लिहिपर्यंत दारुविक्रीला मात्र सुरुवात झाली नव्हती. हळूहळू जिल्ह्यातील अन्य ठिकाणी दारूची दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती आहे.