अखेर पिंडकेपारच्या सहा प्रकल्पग्रस्तांना मिळाला प्लॉट बदलून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:20+5:302021-07-25T04:29:20+5:30
दोन दिवसांपूर्वी किसनाबाई मेहर, विनोद जमजार, दामू साठवणे, दादू कांबळे, कमला रामटेके, शंकर मेश्राम यांना ईश्वरचिठ्ठीने प्लॉट देण्यात आले. ...
दोन दिवसांपूर्वी किसनाबाई मेहर, विनोद जमजार, दामू साठवणे, दादू कांबळे, कमला रामटेके, शंकर मेश्राम यांना ईश्वरचिठ्ठीने प्लॉट देण्यात आले. यावेळी सरपंच कविता आतीलकर, यशवंत सोनकुसरे, मंडल अधिकारी महेश वैद्य, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक वैद्य, बबलू आतिलकर, चरण मते, दादू कांबळे, आलेश मेहर, जागेश्वर रामटेके, दामू साठवणे, विनोद जमजार, सोमा साठवणे, सुग्रताबाई मते, अमित मते, शालिक मते, अमोल जमजार आदी उपस्थित होते.
बॉक्स
उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाळला शब्द
भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यापुढे ही समस्या मांडण्यात आली. त्यावेळी त्यांनी पिंडकेपार आणि बेला येथे जाऊन पाहणी केली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून घेताना महिनाभरात समस्या सुटेल, असे आश्वासन दिले. परंतु तीन वर्षांपासून अधिकारी असेच आश्वासन देत असल्याने त्यावर फारसा कुणाचा विश्वास नव्हता. मात्र उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांनी दिलेला शब्द पाळला. शासकीय पातळीवर सर्व साेपस्कार पार पाडून दोन दिवसांपूर्वी या सहा कुटुंबांना प्लाॅटचे वितरण केले.